फक्त 9 रुपयांत घरी येणार LPG सिलेंडर, फक्त या मोबाईल App वर करा बुकिंग, अशी आहे प्रोसेस

किचनमध्ये दररोज लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी त्रासले असाल तर, तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या मुंबईत 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 809 इतकी आहे. 

Updated: Jun 26, 2021, 04:15 PM IST
फक्त 9 रुपयांत घरी येणार LPG सिलेंडर, फक्त या मोबाईल App वर करा बुकिंग, अशी आहे प्रोसेस title=
representative image

मुंबई : किचनमध्ये दररोज लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी त्रासले असाल तर, तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या मुंबईत 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 809 इतकी आहे. परंतु येथे सांगितलेल्या पद्धतीने गॅस बुक केल्यास तुम्हाला 800 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही फक्त 9 रुपयांत गॅस घरी आणू शकता.

800 रुपयांचा कॅशबॅक ऑफर
Paytm ने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. याअंतर्गत Paytmवर गॅस बुकिंग केल्यास तो जवळपास फ्री मिळू शकतो. Indane, भारत गॅस, HP गॅसचे ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ऑफरच्या अंतर्गत कोणताही ग्राहक पहिल्यांदा Paytm Appच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करेल त्यांना 800 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. 

30 जून पर्यंत आहे ऑफर 

Paytm वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी ऑफर्स जारी करीत असतो. जर तुम्ही गॅस सिलेंडरच्या ऑफरचा अद्याप फायदा घेतला नसेल. तर 30 जून पर्यंत बुकिंग करू शकता.