लग्नात नवरदेवाचा राग अनावर, लहान मुलावर उचलला हात

लग्नात नवरदेवाचा राडा 

Updated: Nov 16, 2021, 10:26 AM IST
लग्नात नवरदेवाचा राग अनावर, लहान मुलावर उचलला हात  title=

मुंबई : लग्न म्हटलं की, धामधूम आली. नाचगाणं आलं. प्रत्येक लग्नाची एक खासियत असते. लग्नाच वेगळेपण हे तिथल्या उत्साहात असतं. या उत्साहाचा अतिरेक झाल्यावर नेमकं काय होतं, हे समोर आलं आहे. लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आङे. यामध्ये नववधू आणि नववरावर पैसे उधळले जात आहे. आणि हे पैसे जमा करण्याच काम लहान मुलं करत आहेत. 

मुलांचा हा कार्यक्रम बराचवेळ सुरू आहे. असा सगळा प्रकार बघून नवरदेव चांगलाच भडकला आहे. एक लहान मुलगा पैसे जमा करताना दिसत आहे. सुरूवातीला नवरदेव त्या मुलाकडे रागाने बघतो. नंतर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो मुलगा काही ऐकायचं नाव नाही घेत. तेव्हा नवरदेव चांगलाच भडकला आहे. नवरदेवाने चक्क लहान मुलावर हात उचलला आहे. 

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात त्यांचा एक नातेवाईक तिथे पोहोचला आणि खिशातून नोट काढून हवेत उडवू लागला. नातेवाइकाने मोठा चष्मा घातला आहे आणि हाताने वधू-वरांवर प्रत्येक नोट टाकत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @balle_jatta_balle)

मग काही मुलं स्टेजवर येतात आणि त्या नोटा बिनदिक्कत लुटायला लागतात. नोट लुटताना त्याने घाईघाईने वराच्या मांडीवरचे पैसे उचलल्याचे त्याच्या लक्षात येत नाही. हे पाहून वराला राग येतो आणि तो मुलाकडे पाहू लागतो. 

मुलाला हे देखील समजते की, वराला राग आला आहे. परंतु तरीही तो त्याच्या कृतीपासून परावृत्त करत नाही. हवेत नोट पाहिल्यानंतर, मुलाने पुन्हा नोट लुटण्यास सुरुवात केली आणि वराच्या जवळ येऊन पडलेली नोट उचलण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात वराने मुलाला जोरदार चापट मारली. वराने मुलाला थप्पड मारताच तो ताबडतोब मंचावरून पळून जातो.