'रक्षाबंधना'साठी आलेल्या बहिणीवर पेट्रोल ओतून पेटवलं

 तरुणीनं तीनही भावांना समान वाटा मिळावा याचा आग्रह धरला होता...

Updated: Aug 28, 2018, 10:47 AM IST
'रक्षाबंधना'साठी आलेल्या बहिणीवर पेट्रोल ओतून पेटवलं title=

चंदीगड : रक्षाबंधनाच्याच दिवशी हरियाणामध्ये एक भयंकर घटना घडलीय. हरियाणाच्या भिवानीच्या सिवानी मंडी शहरात एका तरुणानं राखी बांधायला आलेल्या आपल्या बहिणीलाच पेट्रोल टाकून पेटवून दिलं. या घटनेत तरुणी अत्यंत गंभीररित्या भाजलीय. तिला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या घरात तीन भावांमध्ये घराच्या आणि संपत्तीच्या वाटण्यातून वाद सुरू होता. तरुणीनं तीनही भावंडांना समान वाटा मिळावा याचा आग्रह धरला होता... त्यामुळे तिचा भाऊ कवि कुमार हा नाराज होता. 

रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी विवाहीत बहिण जानकी आपल्या माहेरी आली होती. त्यामुळे कवि कुमार नाराज झाला... या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला... आणि रागातच त्यानं बहिणीला मारहाण केली... आणि पेट्रोल टाकून पेटवून दिलं... 

या घटनेत जानकी गंभीररित्या भाजलीय. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ उपस्थित झाले. बहिणीला जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.