'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का...

त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 

Updated: Aug 11, 2022, 02:57 PM IST
'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का... title=

Stocks to Buy: सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत असताना गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स द्यायला कंपनीचे शेअर्सही सज्ज झाले आहेत. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्समध्ये आता पेैसे कमवण्याच्या दृष्टीने चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 

Nocil: NOCIL ही कंपनी सध्या शेअर बाजारात पुढे आहे. या शेअरचा सध्याचा भाव पाहता हा शेअर तूम्हाला चांगला परतावा देऊ शकतो. गुंतवणूकदार हा स्टॉक 295-320 रुपयांच्या target price वर खरेदी करू शकतात.

Tata Motors: गुंतवणूकदार हा स्टॉक 461-470 रुपयांच्या category मध्ये खरेदी करू शकतात. हा शेअर 509 रुपयांच्या शेअरने खरेदी करता येईल. विश्लेषकांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी या शेअरसाठी 437 रुपयांच्या पातळीवर स्टॉप लॉस ठेवावा. 

FDC: गेहा स्टॉक 300 रुपयांच्या target price वर खरेदी करता येईल. या शेअरसाठी रुपये 263 वर stop loss ठेवला जाऊ शकतो.

NTPC: हा स्टॉक 168 रुपयांच्या  target price वर खरेदी करता येईल. 

MAS Financial Services: या शेअरचा घसरणीचा कल आता थांबताना दिसत आहे. हा स्टॉक 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेडिंग होतो आहे. .येत्या काळात या स्टॉकचा भाव वाढण्याची शक्यता आहे. हा स्टॉक 680-710 रुपयांच्या target price वर खरेदी केला जाऊ शकतो. या स्टॉकवर तुम्ही 3-4 आठवडे होल्ड ठेऊ शकता.