Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच

चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.

Updated: Aug 2, 2022, 05:51 PM IST
Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच title=

मुंबई : आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे ऑप्टीकल इल्यूजन संबंधीत फोटो व्हायरल होत असतात. जे आपल्या मेंदूला चालना देतात आणि आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात. तसेच हा फोटो आपल्या दृष्टीला देखील फसवतो. त्यामुळे जो कोणी यामध्ये लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवेल तो हुशार आहेच म्हणून समजा.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये हरण लपलेले आहे. आपण 9 सेकंदात लपलेले हरण शोधू शकता? केवळ तीन टक्के लोकच हे करू शकतात, असा दावा केला जात आहे. तुमचे डोळे गरुडापेक्षा तीक्ष्ण आहेत का? तुम्ही यामध्ये लपलेला हरीण शोधून दाखवणार का?

चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात. तुम्ही त्या सर्वात प्रतिभावान लोकांपैकी एक आहात का? तर चला पुढे जा आणि शोधण्यासाठी चाचणी करून पहा. जर यशस्वी झालात, तर तुम्हाला प्रतिभावान म्हटले जाईल.

चित्रात हरीण कुठे लपले आहे?

तुम्ही ऑप्टिकल इल्युजनचा फोटो पाहू शकता, ज्यामध्ये सर्वत्र खडक दिसत आहे. परंतु याखडकांमध्ये एक हरीण लपला आहे. या चित्रात, आपण डोंगराच्या उतारावर खडकांचा ढीग पाहू शकतो. या खडकाच्या ढिगाऱ्यात हरीण ओळखणे हे आव्हान आहे. आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 9 सेकंद आहेत.

तुम्हाला या फोटोत आजूनही हरीण दिसला नसेल तरी काळजी करु नका, आता तो तुम्हाला दिसलाच असेल. आता हा फोटो तुमच्या मित्रांकडे पाठवा आणि पाहा त्यांना तो शोधता येतोय का.