नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशच्या नोएडा एक्स्प्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.

Updated: Jul 9, 2017, 08:01 PM IST
नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद  title=

नोएडा : उत्तर प्रदेशच्या नोएडा एक्स्प्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. नोएडा एक्स्प्रेस हायवेच्या सेक्टर १३५मध्ये ही दुर्घटना घडली. भरदाव वेगात जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडीनं शेजारच्या लेनमध्ये असलेल्या गाडीला टक्कर दिली. यामुळे दुसऱ्या गाडीचंही नियंत्रण सुटलं आणि या गाडीनं तिसऱ्या लेनमधल्या गाडीला टक्कर दिली. यामध्ये ही तिसरी गाडी रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या झाडांना जाऊन आपटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताची दृष्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ८ जुलैला हा अपघात झाला होता. 

पाहा अपघाताची थरारक दृष्यं