अग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 20, 2020, 10:05 AM IST
अग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता title=

भोपाळ : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

याआधी मध्यप्रदेशच्या १६ बंडखोर आमदारांचा राजीनामा गुरुवारी रात्री विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी मंजूर केला आहे. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या २२ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे सर्व आमदार कर्नाटकमध्ये हलवण्यात आले होते.

विधानसभेतील आमदारांची संख्या

मध्यप्रदेश विधानसभेच्या एकूण जागा २३०
२ आमदारांचं निधन - २२८ 
काँग्रेसच्या २२ आमदारांचा राजीनामा - २०६
आता विधानसभेत बहुमताचा आकडा - १०४

सद्या स्थिती

भाजप - १०७ आमदार (बहुमताचा आकडा १०५)
काँग्रेस - ९२ आमदार (२२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर)
सपा, बसपा, अपक्ष - ०७ विधायक (सपा- २, बसपा-२, निर्दलीय- ४)
काँग्रेस आणि इतर मिळून संख्या - ९९
काँग्रेसने इतर ७ आमदारांना सोबत घेतलं तरी ते बहुमतापर्यंत पोहोचू शकत नाही.

मध्य प्रदेशमध्ये कमलानाथ सरकार पडण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह यांनी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, नरोत्तम मिश्रा आणि अरविंद भदौरिया यांच्यावर सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी १० मार्चला काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलं त्यानंतर काँग्रेस आमदारांनी राजीनाम दिले आणि सरकार संकटात आलं. काँग्रेस आणि भाजने आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.