सीएनजी आणि घरगुती वापराच्या पाईप गॅसमध्ये 4 टक्के दरवाढ

घरगुती स्त्रोतांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरात केंद्र सरकारनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत.  

Updated: Mar 26, 2018, 10:24 AM IST
सीएनजी आणि घरगुती वापराच्या पाईप गॅसमध्ये 4 टक्के दरवाढ title=

नवी दिल्ली : घरगुती स्त्रोतांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरात केंद्र सरकारनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या किंमती तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत.  

येत्या एक तारखेपासून नवे दर अस्तित्वात येतील. ऑक्टोबर 2017 पासून आंतरराष्ट्रीय बाजारात  नैसर्गिक वायूच्या दरात 5 ते 7 टक्क्कांची वाढ झालीय. 

त्याच प्रमाणात देशांतर्गत सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन दरातही वाढ करण्यात आली. पण आंतरराष्ट्रीय दरांनुसार देशांतर्गत गॅस उत्पादकांना मात्र जुन्या दरातच उत्पादन आणि विक्री करावी लागत होती. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलंय.