फानी, फोनी की फनी, वादळाच्या नावावरुन गोंधळ

वादळाच्या नावावरुन जगभरात 

Updated: May 3, 2019, 07:25 PM IST
फानी, फोनी की फनी, वादळाच्या नावावरुन गोंधळ title=

मुंबई : फनी हे चक्रीयवादळ शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलं. हे वादळ 245 किमी. प्रति तासाच्या वेगात वाहत होते. अनेक झाडे, घरे, गाड्या आणि होड्या या वादळात सापडल्या. पण देशात वादळाच्या नावावरुन बराच गोंधळ पाहायला मिळाला. कोणी फोनी, कोणी फानी तर कोणी फनी म्हणतं आहे.

या चक्रीयवादळाचं नाव बांगलादेशने सुचवलं होतं. बांगलादेशने 'फणी' असं नाव दिलं आहे. पण याचा उच्चार बांगलादेशमध्ये फोनी असा करतात. या शब्दाचा अर्थ साप असा आहे. देशात आणि परदेशातही या नावावरुन गोंधळ पाहायला मिळाला. इंग्रजीमध्ये त्याला Fani असं लिहिलं जात आहे. पण मराठीत त्याचा उच्चार फनी असा होतो.

आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने सगळ्यात आधी वादळांना नाव देण्य़ाची प्रथा सुरु केली होती. त्यानंतर 2004 मध्ये भारताने देखील वादळांना नाव देण्यास सुरुवात केली. प्रशांत महासागरात भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंड हे देश देखील नावं सुचवतात. या ८ देशांनी सुचवलेल्या नावांच्या पहिल्या अक्षरावरुन त्यांचा क्रम ठरवला जातो. त्या क्रमानुसार चक्रीय वादळांना नावे दिली जातात.

मागच्या वर्षी आलेल्या चक्रीयवादळाला तितली हे नाव देण्यात आलं होतं. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर यामुळे मोठं नुकसान झालं. हे नाव पाकिस्तानने दिलं होतं. 2017 मध्ये आलेल्या चक्रीयवादळाला ओखी हे नाव देण्यात आलं होतं. हे नाव बांगलादेशने सुचवलं होतं. केरळ आणि तमिळनाडूमध्ये या वादळामुळे मोठं नुकसान झालं होतं.

आठ देशांच्या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनाइजेशनला भविष्यात येणाऱ्या वादळांना नाव देण्यासाठी एक यादी देण्यात आली आहे. यामध्ये बांग्लादेशने दिलेल्या फोनी हे नाव घेण्यात आलं. या यादीत भारताने 'अग्नि', 'बिजली', 'मेघ', 'सागर' आणि 'आकाश' ही नावे सुचवली आहेत.