Corona : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढवली, या तारखेपर्यंत परदेशात जाण्यास मनाई

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरकारचा निर्णय

Updated: Apr 30, 2021, 03:35 PM IST
Corona : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढवली, या तारखेपर्यंत परदेशात जाण्यास मनाई title=

नवी दिल्ली : शुक्रवारी भारताने आंतरराष्ट्रीय कमर्शियल उड्डाणांवरील स्थगिती वाढविली आहे. त्यामुळे या उड्डाणांना 31 मे 2021 पर्यंत प्रवास करता येणार नाहीये. कोरोना संसर्गाच्या घटनांमुळे पुन्हा एकदा देशात दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून डीजीसीएने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) परदेशी उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत वाढविली आहे. याचा अर्थ असा की आता लोकांना 31 मे पर्यंत परदेशात जाता येणार नाहीये.

कोरोनाचा सर्व देशभरात संसर्ग वाढत असल्याने भारत सरकारने 26 जून 2020 रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली. यानंतर डीजीसीएकडून वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. पण आता ही बंदी 31 मे पर्यंत वाढवली गेली आहे.

भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे इतर देशांनी देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.