दिल्लीत कोरोना रुग्णांचा वेग मंदावला; रिकव्हरी रेट ८७.९५ टक्के

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली.   

Updated: Jul 26, 2020, 08:43 PM IST
दिल्लीत कोरोना रुग्णांचा वेग मंदावला; रिकव्हरी रेट ८७.९५ टक्के  title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. सध्याची आकडेवारी पाहता देशात देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,८५,५२२ इतकी झाली आहे. यापैकी ४,६७,८८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशभरात ३२,०६३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १ हजार ७५ नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे दिल्लीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३० हजार ६०६वर पोहोचली असून २१ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्तवाचं म्हणजे दिल्लीत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८७.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ११ हजार ९०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत ७१४ कंटेन्मेंट झोन आहेत. ६ हजार ९७६ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय आतापर्यंत  ९ लाख ४६ हजार ७७७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण मिळाले आहेत. तर ७०५ जणांचा मृत्यू झाला आहे.