Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण का होतायंत गंभीर?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकं अधिक आजारी का पडत आहेत?

Updated: Apr 24, 2021, 10:17 PM IST
Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण का होतायंत गंभीर? title=

मुंबई : कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यामुळे, सात दिवसानंतर बर्‍याच रुग्णांची प्रकृती खालावत आहे, तर पहिल्या लहरीमध्ये, बहुतेक रुग्ण सात दिवसांत बरे होते. त्या वेळी बर्‍याच रूग्णांची प्रकृती बिकट झाल्यानंतर ही ते 7 दिवसात बरे होते होते. परंतु बर्‍याच रुग्णांना आता सात दिवस किरकोळ लक्षणे दिसतात. यानंतर अचानक त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. दोन दिवसांत त्याची प्रकृती खूप गंभीर बनते.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशी बरेच प्रकरणे आहेत ज्यात रुग्णांची स्थिती पूर्णपणे सामान्य दिसते पण सीटी स्कॅनमध्ये 40 टक्के संसर्ग झाल्याचं दिसतं. डॉक्टर असेही म्हणतात की रुग्ण तपासणी करण्यासाठी उशीरा येत आहेत. पॉझिटिव्ह आल्या नंतरही ते घरीच राहतात आणि स्वत:चा उपचार करतात. त्यामुळे प्रकृती बिघडण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे.

डॉ. पराग शर्मा म्हणतात की, 'दाखल झालेल्या रूग्णांना आणि ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना पाहून, हे समजले की नवीन लाटेत सात दिवसानंतर कोरोना, रुग्ण अचानक गंभीर होत आहेत. यापैकी बहुतेक होमक्वारंटाईन असलेले रुग्ण आहेत.'

यापूर्वी सुमारे 70 टक्के लोकांना ताप येत होता. आता तापाचे रुग्ण केवळ 20 ते 30 टक्के आहेत. याचे मुख्य कारण व्हायरसच्या रुपात बदल होणे आहे. डॉ. शर्मा म्हणाले की, रुग्णांनी 14 दिवस सतर्क राहावे.

डॉ. लोकेंद्र दवे म्हणाले की, 'लक्षणे दाखवल्यानंतर सात दिवसानंतर बर्‍याच रुग्णांची प्रकृती खालावत आहे हे खरे आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे या वेळी तपासणीसाठी रुग्ण उशिरा येत आहेत. गेल्या वेळी कोरोनाबाबत लोकांमध्ये अधिक भीती होती.'

डॉ. कृष्णा जी. सिंह म्हणाले की, 'ताप केवळ30 टक्के रुग्णांना येत आहे, तोदेखील 100 अंशांच्या खाली आहे. अतिसार, डोळ्यांत लालसरपणा, खाज सुटणे, जास्त घाम येणे यासारखी लक्षणे तसेच पोटदुखी देखील होते. काही रुग्णांना असे वाटते की त्यांना कोरोना नव्हे तर पोटाची समस्या आहे. ते चाचणीसाठी जात नाहीत.'