सासऱ्याचा सुनेवरच डोळा; घरी एकटी असतानाच ओलांडल्या सर्व मर्यादा

हवालदार असलेल्या महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे

Updated: Jun 30, 2021, 03:49 PM IST
सासऱ्याचा सुनेवरच डोळा; घरी एकटी असतानाच ओलांडल्या सर्व मर्यादा title=

मेरठ : उत्तर प्रदेशात हवालदार असलेल्या महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्याहून संतापजनक म्हणजे नवऱ्याला माहिती होताच त्यानेही तिला तीन तलाक दिला.

उत्तर प्रदेश पोलिसांत हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचं पोलीस अधिकाऱ्याशी लग्न झालं होतं. तिचा सासरादेखील reserve police force Provincial Armed Constabulary (PAC) चा अधिकारी होता.  लग्न झाल्यापासून सासरा सुनेला माहेरून पैसे आणि हुंडा आणण्यासाठी छळत होता. तिला मारहण करीत होता. गेल्या ३ वर्षापासून हे सुरू होतं.

गेल्या आठवड्यात बुधवारी (23 जून) च्या रात्री अबीद (पीडितेचा नवरा)घरी नसल्याची संधी साधून, सासरा नझीरने सुनेवर बलात्कार केला. घडलेली बाब कोणालाही सांगितली तर जिवे मारण्याचीही धमकी सासऱ्याने दिली. पीडितेने ही बाब अबीदला सांगितली. अबीद हा पोलीस अधिकारी असल्याने त्याने यावर कारवाई करणे अपेक्षित होती. परंतु त्याने पीडितेला तीन तलाक दिला.

मेरठचे पोलीस अधिक्षक विनित भाटनगर यांनी मुख्य आरोपी नझीर आणि अबीद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.