बाप आणि काका निघाले हैवान, सख्ख्या बहिणींनी सत्य सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली

काका हैवान होता पण वडिलांना सत्य सांगितल्यावर बाप ही हैवान झाला.

Updated: Nov 27, 2022, 10:20 PM IST
बाप आणि काका निघाले हैवान, सख्ख्या बहिणींनी सत्य सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली title=

Crime News : छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या बहिणींवर वडील आणि काकांनीच बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत खुलासा करताना माहिती दिली की, ऑगस्ट 2017 मध्ये जेव्हा मोठी बहीण 16 वर्षांची होती तेव्हा तिचे लैंगिक शोषण सुरू झाले. त्यानंतर पहिल्यांदा काकांनी घरी काकू नसताना विनयभंग केला होता. पोलिसांनी शनिवारी भिलाई शहरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. (Father and Uncle molests sister)

या दोन्ही बहिणींचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाप आणि काकांच्या अत्याचाराला कंटाळून या दोन्ही मुली घरातून पळून गेल्या होत्या. त्यांनी 6 वर्षापूर्वी घर सोडलं. त्यानंतर वडिलांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी त्या मुलींना शोधून काढले. पण जेव्हा मुलींनी सत्य सांगितले तेव्हा पोलिसांना ही धक्का बसला.

2017 मध्ये या मुलींवर पहिल्यांदा बलात्कार झाला. पोलिसांनी सांगितले की, या दोघी बहिणी मावशीच्या घरी जात होत्या, कारण त्यांची आई मानसिक आजारामुळे त्यांची काळजी घेऊ शकत नव्हती. काकांनी आधी मोठ्या मुलीवर बलात्कार केला.

मुलीने याबाबत वडिलांकडे तक्रार केली असता त्यांनी मुलीला शिवीगाळ करून पळवून लावले आणि नंतर तिच्या वडिलांनीही तिचा विनयभंग सुरू केला. 14 वर्षांच्या मुलीचाही वडिलांनी विनयभंग सुरू केल्यावर मुलींनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (बलात्कार) आणि कलम 354 (महिलेचा विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.