श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये १ जवान शहीद झाला आहे तर २ जवान जखमी झाले आहेत.

Updated: Jun 24, 2017, 07:29 PM IST
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद title=

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या गाडीवर हल्ला केला त्यामध्ये १ जवान शहीद झाला आहे तर २ जवान जखमी झाले आहेत.

श्रीनगरमधील पांथा चौक बस स्टॉप जवळ सीआरपीएफच्या पथकावर  दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ पथकावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी श्रीनगरच्या डीपीएस शाळेच्या दिशेने पळून गेले.

या झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान(उपनिरीक्षक) शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय.