नागरिकत्व सुधारणा कायदा: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन

Bollywood Life | Updated: Dec 15, 2019, 11:52 AM IST
नागरिकत्व सुधारणा कायदा: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी title=

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाही. आसामच्या गुवाहटीसह अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. राज्यातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी सर्वानांद सोनोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची लकवरच भेट घेणार आहेत. चुकीच्या माहितीमुळं राज्यातील स्थिती गंभीर होत असल्याचा आरोप आसाम सरकारनं केला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणा वातावरण सामान्य झालेलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आज (रविवार) दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आसाममध्ये अजूनही विरोध सुरु आहे. आंदोलन उग्र होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये आज सकाळी 9 पासून रात्री 7 वाजेपर्यंत कर्फ्यु कमी करण्यात आला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावर असम गण परिषदेने यू-टर्न घेतला आहे. आधी समर्थनात असलेल्या या पक्षाने आता विरोध सुरु केला आहे. याबाबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आसाममधील 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. अनेक ठिकाणी अतिरिक्त पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यास बिगर भाजपशासित राज्यातून विरोध होतोय. महाराष्ट्रातही हा कायदा लागू होईल का, याबाबत शंका उपस्थित केला जात आहे.