Amazon ला 30 लाखांचा गंडा घालणारा आरोपी अटकेत

आयफोन आणि सॅमसंग कंपनीचे महागडे फोन जप्त

Updated: Jan 31, 2019, 07:22 PM IST
Amazon ला 30 लाखांचा गंडा घालणारा आरोपी अटकेत title=

नवी दिल्ली : अॅमेझॉनवर बेड डिलीव्हरी ट्रिकचा वापर करत 30 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या आरोपीला राज्य सायबर सेलने अटक केली आहे. कोटा राजस्थानचा राहणारा आरोपी मोहम्मद हा इंदूरच्या जेल रोडवर अनेक मोबाईल दुकानांमध्ये जावून मोबाईल विकायचा. हे मोबाईल तो अॅमेझॉनवरुन फसवणूक करुन मिळवायचा. आयफोन आणि सॅमसंग कंपनीचे महागडे फोन तो चोरायचा आणि दुकानांमध्ये जावून विकायचा. 

आरोपीने यासाठी अनेक खोटे इमेल बनवले होते. महागडे मोबाईल फोन तसेस इलेक्ट्रॉनिक उपकरणे अॅमेझॉनवर बुक करुन त्यानंतर अॅमेझॉनला खाली पार्सल/खराब सामान/ वेगवेगळे कारण देत तो वस्तू परत करायचा आणि 100 टक्के रिफंड देखील घेत होता. 

मागील एक वर्षात आरोपीने 50 हून अधिक मोबाईल आणि वस्तू मिळवले. अॅमेझानला गंडा घालणारा हा आरोपी स्वत:ला अॅमेझॉनचा अधिकारी असल्याचं सांगायचा. या प्रकरणात आणखी आरोपींचा तपास देखील सुरु आहे.
 
अॅमेझॉन कंपनीने सायबर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू

1) Samsung note-9 

2) Sony PS-4 

3) ASUS Wireless Router 

4) Samsung Smart Watch 

5) Apple Smart Watch 

6) Axis Bank Credit Card

7) Sony Wireless Headphone