क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा

cyber fraud : दररोजच्या जमा खर्चाचा ताळमेळ करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असते. त्यामुळे अनेकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी क्रेडिट कार्ड मदतीला येते. परंतू क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी एका ग्राहकाने गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली. 

Updated: Jan 28, 2022, 03:37 PM IST
क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा title=

पुणे : दररोजच्या जमा खर्चाचा ताळमेळ करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असते. त्यामुळे अनेकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी क्रेडिट कार्ड मदतीला येते. परंतू क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी एका ग्राहकाने गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली. आणि त्याच्या खात्यातून थेट 1 लाख 69 हजार रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले.

पुण्यात खराडी येथे राहणाऱ्या एका इसमाने 44 वर्षांच्या चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार नोंदवली आहे. एका इसमाने आपले क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च केला. एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकेचा कस्टमर नंबर त्याने गुगलवरून मिळवला. 

दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलवर तरुणाला एनी डेस्क ऍप आणि एसबीआय बँक योनो ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याने ऍप डाऊनलोड केल्यानंतर योनोचा पासवर्ड बदलण्यास सांगितले. तरुणाने पासवर्ड बदलला असता, त्याच्या एसबीआय बँक खात्यावरून सायबर चोरांनी 1 लाख 69 हजार रुपये काढून गंडा घातला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.