कुलगाममध्ये डीसीपीच्या गाडीतून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण हिजबुलचा टॉप कमांडर आहे

Updated: Jan 12, 2020, 09:13 AM IST
कुलगाममध्ये डीसीपीच्या गाडीतून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक  title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तपासणीदरम्यान, पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केलीय. धक्कादायक म्हणजे, हे तीनही दहशतवादी एका डीसीपीसोबत एकाच गाडीतून प्रवास करत होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण हिजबुलचा टॉप कमांडर आहे. सय्यद नवीन उर्फ नवीद बाबू असं या दहशतवाद्याचं नाव आहे. नवीद दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. त्यानं काश्मीरमध्ये अनेक दहशवतवादी हल्लेही घडवून आणले होते.

पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून काही हत्यारंही जप्त केली आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नावीद नाजनीनपुरा भागात गैर-स्थानिक लोकांच्या हत्येतही सहभागी होता.