नवी दिल्ली : ज्या पद्धतीने जन्माच्या आधी 9 महिन्यापर्यंत व्यक्ती गर्भात असतो. त्याच पद्धतीने मृत्यूच्या 9 महिने आधीपासून व्यक्तीच्या शरीरात बदल होतात. हे बदल मृत्यू येण्याचे संकेत असतात. वेळेनुसार मृत्यूचे जवळ येत असताना अनेक गोष्टी घडतात. जे व्यक्तीला एकदम वेगळा अनुभव देतात. पुराणांमध्ये याबाबत सविस्तर लिहण्यात आले आहे. व्यक्तीने या संकेतांकडे लक्ष दिले तर, त्याचा मृत्यू शांत आणि सहज होतो.
चक्रांचे तुटने
योग विज्ञानानुसार व्यक्तीच्या शरीरात 7 चक्र असतात. जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते. त्यावेळ नाभी चक्र तुटू लागते. जन्माच्यावेळी व्यक्तीचे शरीर या चक्राने बनने सुरू होते. प्राण देखील येथूनच निघतो. चक्र तुटल्यानंतर शरीरात होणारे बदल अनुभवता येतात. तेव्हा समजायला हवे की, मृत्यू जवळ येत आहे.गरुड पुराण तसेच काही शास्त्रांच्या मते मृत्यू येण्याआधी काही महत्वाचे संकेत सांगण्यात आले आहे.
काही संकेत
- मृत्यूच्या आधी व्यक्तीला आपले नाक दिसने बंद होते.
- मृत्यूला तेल किंवा पाण्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही. म्हणूनच म्हणतात की मृत्यूच्या वेळी व्यक्तीची सावलीसुद्धा सोबत सोडते.
- मृत्यूच्या आधी व्यक्तीच्या हातातील रेषा बारीक होतात. डोळ्यांना दिसेनाशा होतात.
- स्वप्नात काहीही विचित्र घटना घडतात. जसे की दिवा विझताना दिसून येणे.
- मृत्यूच्या आधी व्यक्तीला आपल्या जवळपास आत्मा असल्याचा अनुभव येतो. या पुर्वजांच्या आत्मा असतात.
-मृत्यूच्या आधी व्यक्तीचा श्वास विरूद्ध चालू लागतो. अनेकदा त्याला यमदूत एवढ्या जवळ दिसतात की, जवळपास असणारे लोक दिसत नाही.
-------------------------------------
(नोट - या लेखात दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीच्या आधारावर आहे. zee24taas याची खात्री देत नाही.)