चीन सीमेवर रस्ते बांधकामांना वेग, संरक्षण मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

बांधकामांच्या कामांना वेग देण्याच्या सूचना

Updated: Jul 7, 2020, 03:33 PM IST
चीन सीमेवर रस्ते बांधकामांना वेग, संरक्षण मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक title=

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असला तरी. पण भारत सतर्क आहे आणि या संबंधित सर्व कामं सुरु आहेत. मंगळवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील रस्ते आणि इतर बांधकामांबाबत आढावा बैठक घेतली.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) कडे सीमेवरील सर्व बांधकामांची जबाबदारी असते. मंगळवारी संरक्षणमंत्र्यांनी बांधकामांच्या कामांना वेग देण्याबरोबरच बीआरओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला.

या बैठकीत एलएसी तसेच एलओसी येथे सुरु असलेल्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला. बीआरओला सर्व बांधकाम कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. यादरम्यान बीआरओचे डीजी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी संपूर्ण माहिती दिली.

केवळ चीन सीमेजवळ अनेक पुलांचे बांधकाम सुरू आहे. एलएसी जवळ पूल आणि रस्ते बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी नीमूला भेट दिली. तेथे ही पूल-रस्त्यांचे काम चालू आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मोठ्या प्रमाणात मोक्याचा रस्ते आणि पूल बनवत आहे. अनेक पुलांचे काम सुरू आहे, त्यापैकी २० पूल तयार आहेत. 2022 पर्यंत 66 रस्ते बांधण्याचे लक्ष्य आहे.

अलीकडेच एक बातमी समोर आली होती की राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने देखील सीमेवर रस्ता बांधकाम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्प दिला आहे. याशिवाय त्यांना वेळेत काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम झाला होता, परंतु जेव्हा अनलॉक सुरू झाले आणि चीनसोबत ताणतणाव वाढला. तेव्हा अतिरिक्त मजूर सरकारकडून लेह, लडाख येथे पाठविण्यात आले आहेत. आता हजारो मजूर रस्ता-पूल आणि इतर लष्करी संबंधित बांधकामांच्या कामात गुंतले आहेत.

चीनच्या भारताच्या या रस्ते बांधकामांमध्ये अडथळे आणत आहे. भारत दौलत बेगपर्यंतच्या रस्त्यांचे जाळे मजबूत करीत आहे. परंतु चीनला अशी भीती आहे की यामुळे त्याच्या वन बेल्ट प्रकल्पाला अडथळा येऊ शकेल. कारण तेव्हा भारतीय सैन्य सहज येथे पोहोचू शकेल.