शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट

Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

Updated: Feb 13, 2024, 06:29 PM IST
शेतकरी भिडले, पोलीस चिडले!  शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट title=

Farmers Protest In Delhi : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्याचे वादळ धडकले आहे. दिल्लीच्या वेशीवर धडकणा-या शेतक-यांवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे. पंजाबच्या अंबालात शंभू बॉर्डरजवळ पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.  यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. शेतकी कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीत यामुळे या आंदोलनाचा वणवा आणखी पेटणार आहे. 

शंभू बॉर्डरवर शेतकरी-पोलीस जोरदार भिडले

शेतकऱ्यांच्या मोर्चा पंजाबच्या अंबालात शंभू बॉर्डरजवळ पोहचताच पोलिांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी थांबले नाहीत. यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रत्युत्तरादाखल शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक केली. शंभू बॉर्डरवर शेतकरी-पोलीस जोरदार भिडले. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट लागलंय. पंजाब हरयाणातील लाखो शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. यामुळे दिल्लीच्या सीमांवर वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. डीएनडी  आणि चिल्ला बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

2 वर्षांपूर्वी सरकारनं मान्य केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक

2 वर्षांपूर्वी सरकारनं मान्य केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मान्य केलेल्या मागण्या अजूनही प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीच्या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप करत संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीकडे कूच केली आहे. दरम्यान शेतक-यांच्या 13 पैकी 10 मागण्या मान्य केल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित 3 मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन सरकारने दिले आहे. लाखो शेतकरी दिल्लीकडे येत असल्यानं सरकारनंही जोरदार तयारी सुरु केलीय. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेट्स घालण्यात आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून तारांचं कुंपणंही घालण्यात आले आहे. सिँघु, टिकरी बॉर्डरवर सीआरपीएफचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनावरुन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टिका केली आहे. श्रमाचं फळ मागणाऱ्या शेतकऱ्यांना रोखल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.