Dhirubhai Ambani यांच्या एका आयडियानं कसं उभं राहिलं रिलायन्स नावाचं साम्राज्य?

Indian Businessmen Dhirubhai Ambani 90th Birthday: आज भारतातले सर्वात मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा (Ambani Reliance Industries) जन्मदिवस आहे. अंबानी कुटुंबियांची भारतातच नाही तर जगात ओळख आहे. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र अनिल आणि मुकेश अंबानी (Mukesh and Anil Ambani) यांनी त्यांचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. 

Updated: Dec 28, 2022, 12:43 PM IST
Dhirubhai Ambani यांच्या एका आयडियानं कसं उभं राहिलं रिलायन्स नावाचं साम्राज्य?  title=
Dhirubhai Ambani birthday how he started reliance industries with having 500 rupees in hand success story

Indian Businessmen Dhirubhai Ambani 90th Birthday: आज भारतातले सर्वात मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा (Ambani Reliance Industries) जन्मदिवस आहे. अंबानी कुटुंबियांची भारतातच नाही तर जगात ओळख आहे. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र अनिल आणि मुकेश अंबानी (Mukesh and Anil Ambani) यांनी त्यांचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. आज त्यांची संपत्ती की लाखो नाही, करोडो नाही तर अब्जोंच्या घरात आहे. आज त्यांची नातवंडंही त्यांचा बिझनेस पुढे घेऊन जात आहेत. आज मुकेश अंबानी हे आशियातील (Most Rich Persons in Asia) सर्वात श्रीमंत व्यक्तीपैंकी एक आहेत. तरूण वयातच धीरूभाई अंबानी यांनी आपलं साम्राज वाढवलं होतं. जे त्यांच्या हयातीनंतर शाबूत आहे. आज त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील असेच काही रंजक किस्से. एकेकाळी पेट्रोल पंपावर 300 रूपये कमावणारे धीरूभाई अंबानी यांनी आपलं साम्राज्य आज अब्जोंच्या घरात केलं आहे. ज्याची प्रेरणा आजच्या नव्या तरूण पिढीलाही खूप उत्तेजन देते. आपली हीच नोकरी सोडून धीरूभाई अंबानी यांना एक आयडिया सुचली, पण काय होती ती आयडिया? जाणून घेऊया. (Dhirubhai Ambani birthday how he started reliance industries with having 500 rupees in hand success story)

धीरूबाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्री (Reliance Industries) हे आपलं व्यवसाय साम्राज्य उभारलं. आज रिलायन्स इंडस्ट्रीज हरएक क्षेत्रात आपलं नावं कमावलं आहे. परंतु तुम्हाला माहितीये का या हे भलेमोठे साम्राज्य उभारण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट आणि धाडसानं काम तर केलेच परंतु त्यांच्या त्या एका कल्पनेनं त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचं ते स्वप्न साकारलं आहे. 

कोण होते धीरूभाई अंबानी 

धीरजलाल हिराचंद अंबानी असं धीरूभाई अंबानी यांचं संपूर्ण नावं होतं. त्यांच्या जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी जुनागढ येथे झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नव्हती. तेव्हा धीरूभाई अंबानी यांनी आपलं दहावीचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मिळेल ती कमी पैशांची नोकरी करून पैसे कमवायला सुरूवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनी व्यवसाय हा आजच्या तारखेला 17 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप (Market Cap) आहे. 2000 मध्ये धीरूभाई अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि बिझनेसमन ठरले. तेव्हा त्यांची जीवनशैलीही साधीसरळं होती. ते 10 तासांपेक्षा जास्त वेळ काम करत नव्हते. त्यांच्या 350 स्क्वेअर फूटच्या ऑफिसमध्ये एक टेबल, तीन खुर्च्या आणि एक टेलिफोनच असायचा. ते सर्वाधिक वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवत असतं. 6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांचे मुंबई निधन झाले. 

17 व्या वर्षी 300 रूपयांची नोकरी 

1949 साली आपल्या घराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आणि अभ्यासातही फारसा रस नसल्यामुळे ते देशाबाहेर गेले.कसे गेले यामागेही रंजक कहाणी आहे. धीरूभाई अंबानी हे येमेनमध्ये त्यांचे भाऊ रमणिकलाल यांच्याकडे गेले. तिथे त्यांना नोकरी मिळाली. पेट्रोल पंपावर काम करत असताना त्यांना 300 रूपये मिळायचे. ए. बेसी अँड कंपनी नावाच्या फिलिंग स्टेशनवर (fIlling Station) त्यांनी काम करायला सुरूवात केली होती. त्यांच्या कामावर खुश होत तिथे त्यांना तिथल्या वरिष्ठांनी व्यवस्थापक म्हणून नेमले. हाच त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. 

आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं 

येमेनमध्ये पेट्रोल पंपावर काम करत असतानाच धीरूभाईंनी ठरवलं की काहीतरी वेगळं करून दाखवायचं. हीच इच्छाशक्ती घेऊन ते तब्बल पाच वर्षांनी म्हणजेच 1954 ला भारतात परतले. घरी येताच त्यांनी ठरवलं की आता थांबायचं नाही आणि त्यांच्या खिशातले 500 रूपये घेऊन ते मुंबईकडे आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी मुंबईत गेल्यावर व्यवसाय आणि मार्केटबद्दल पुष्कळ माहिती काढायला सुरूवात केली. तेव्हा माहिती काढताना त्यांना समजले की पॉलिस्टरला (Polyster) भारतात मागणी आहे तर भारतीय मसाल्यांना (Indian Spices) परदेशात सर्वाधिक मागणी आहे आणि मग त्यांनी याच क्षेत्रात आपला व्यवसाय करायचे ठरवले. 

रिलायन्स कंपनीचं स्वप्न झालं साकार

याच प्रेरणेतून त्यांनी माहिती, संशोधन आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या आयडियानं 8 मे 1973 रोजी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. या व्यवसायातून त्यांनी भारतीय मसाले परदेशात आणि परदेशी पॉलिस्टर भारतात विकले जातं आणि यातूनच साकार झालं रिलायन्सचं मोठं साम्राज्य.