अयोध्या खटल्याचा निर्णय येण्याअगोदरच FIR दाखल

महाराष्ट्रात दाखल झाली पहिली FIR 

Updated: Nov 9, 2019, 11:50 AM IST
अयोध्या खटल्याचा निर्णय येण्याअगोदरच FIR दाखल  title=

प्रशांत परदेसी, नवी दिल्ली : अयोध्या खटल्याचा निकाल शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी लागला आहे. वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच आहे. ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिमांना अयोध्येत 5 एकर पर्यायी जमीन देण्याचे आदेश दिले आहेत. ऐतिहासिक निकालाकरता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नागरिकांना शांतता राखावी अशी मागणी केली होती. असं असताना देखील महाराष्ट्रातील एका व्यक्तीवर अयोध्या खटल्या प्रकरणी भडकाऊ टिप्पणी केली होती. महत्वाची बाब म्हणजे ही टिप्पणी निर्णय येण्या अगोदरच केली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर भडकाऊ टिप्पणी करण्याबाबत महाराष्ट्र धुळ्यातील संजय शर्मा यांच्यावर FIR दाखल झाली आहे. संजय शर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की,'राम मंदिरचा निर्णय झाल्यानंतर दिवाळी साजरी करेन'. ज्यानंतर धुळ्यातील आझाद नगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. (हे पण वाचा: Ayodhya Verdict : वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय) 

मुंबई पोलीस कमिश्नर संजय बर्वे यांनी शुक्रवारीच राम मंदिराचा निर्णय काहीही येवो नागरिकांना शांतता राखण्यास सांगितले होते. पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणे, माहिती आणि व्हिडिओंवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ९ ते ११ तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. शहरात ड्रोन कॅमेराने नजर ठेवण्यात येणार आहे, तसेच सोशल मीडियासंदर्भात ऍडवायजरी लागू करण्यात आली आहे.