तुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा

Contactless Debit Card: डेबिड आणि क्रेडिट कार्डमध्ये काळानुरुप बरेच बदल करण्यात आले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अनेक अपडेट करण्यात आले आहेत. कार्ड क्लोनिंगचा प्रकार थांबवण्याासाठी चिप इनेबल्ड कार्डमध्ये वेगाने अपग्रेड केले गेले आहेत. जर तुम्ही एक दोन वर्षात नवं कार्ड घेतलं असेल तर तुमच्याकडे वायफाय इनेबल्ड कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड असेल. 

Updated: Nov 27, 2022, 05:21 PM IST
तुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा title=

Contactless Debit Card: डेबिड आणि क्रेडिट कार्डमध्ये काळानुरुप बरेच बदल करण्यात आले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अनेक अपडेट करण्यात आले आहेत. कार्ड क्लोनिंगचा प्रकार थांबवण्याासाठी चिप इनेबल्ड कार्डमध्ये वेगाने अपग्रेड केले गेले आहेत. जर तुम्ही एक दोन वर्षात नवं कार्ड घेतलं असेल तर तुमच्याकडे वायफाय इनेबल्ड कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर एकदा कार्ड व्यवस्थित चेक करा. त्यावर तुम्हाला वायफायचे चिन्ह दिसेल. हे चिन्ह असल्यास तुमच्या कार्डमध्ये वायफाय सुविधा आहे. यामुळे कार्ड स्वाइप करण्याची गरज नसते. पीओएस मशिनवर कार्ड नुसतं ठेवल्यास पेमेंट करू शकता. यासाठी पिन नंबर टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दुकान, रेस्टॉरंटमध्ये कार्डद्वारे पेमेंट करू शकता. वायफाय इनेबल्ड म्हणजे वायफायवर चालतं असं नाही. हे कार्ड NFC (Near Field Communication) आणि RFID (Radio Frequency Identification) वर काम करतात. त्यात एक चिप असते, जी अतिशय पातळ धातूच्या अँटेनाला जोडलेली असते.

तर तुमची फसवणूक होऊ शकते

कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला पिन किंवा ओटीपीची गरज नाही. तुम्हाला फक्त POS मशीनला कार्डने स्पर्श करावा लागतो. या कार्ड्सची रेंज 4 सेमी आहे. पण तुमचं कार्ड खिशात असताना  पीओएस मशीन तुमच्या कार्डच्या संपर्कात आणले, तर तुम्हाला कळणारही नाही आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेलेत. काही गुन्ह्यांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. काही चोरटे पीओएस मशीन घेऊन कार्डातून पैसे चोरतात. गर्दीच्या ठिकाणी फसवणुकीचे प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

बातमी वाचा- PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत

कॉन्टॅक्टलेस कार्ड सुरक्षित कसे ठेवायचे?

जर तुम्ही तुमच्या पाकिटात असं कार्ड ठेवलं असेल तर काळजीपूर्वक हाताळा. एकतर तुम्ही हे कार्ड अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा तुम्ही मेटल वॉलेट वापरू शकता. तुम्हाला RFID ब्लॉकिंग वॉलेट देखील सापडतील, जे तुमचे कार्ड सुरक्षित ठेवतील. कार्डने पेमेंट करताना, नेहमी तुमच्यासमोर पेमेंट करण्यास सांगा. रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये पेमेंट प्रक्रिया स्वतः करा. व्यापार्‍याला कार्ड देण्याऐवजी, त्याला स्वतः स्पर्श करा आणि पेमेंट झालं की नाही ते तपासा. पैसे कापल्यानंतर तुमचे बिल आणि मेसेज देखील तपासा.