गाडीतच मोबाईल क्लिनिक, आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांना आरोग्य सुविधा देणारा डॉक्टर

त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हते. हे त्यांना सहन झाले नाही, त्यांनी लगेच जावून त्या मुलाचा प्राथमिक उपचार केला आणि रुग्णालयात घेऊन गेले.     

Updated: May 22, 2019, 03:21 PM IST
गाडीतच मोबाईल क्लिनिक, आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांना आरोग्य सुविधा देणारा डॉक्टर title=

मुंबई : उत्तर कर्नाटकच्या बीजापूरमध्ये एका शेतकरी कुटूंबात जन्मलेले सुनील कुमार हेब्बी यांनी लहानपणापासून लोकांना मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना पाहिलंय. सुनील यांनी मेडिकलचे शिक्षणही कर्ज काढून पूर्ण केले. ते डॉक्टर झाले आणि बेंगलुरूच्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नोकरी मिळाली, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला खूप आनंद झाला. कारण त्यांना असे वाटले की, आता ते चांगले कमवतील त्यांना कोणता त्रास नाही होणार.    

डॉ. सुनील त्यांची नीट नोकरी करत होते. दिवस-राञीच्या मेहनतीने त्यांना ओळख दिली. एक दिवस सुनील रुग्णालयातुन कामावरून येत असताना, होसूर रस्त्यावर त्यांना अपघातात जखमी असलेला एक मुलगा दिसला. त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हते. हे त्यांना सहन झाले नाही, त्यांनी लगेच जावून त्या मुलाचा प्राथमिक उपचार केला आणि रुग्णालयात घेऊन गेले.     

थोड्या दिवसानंतर त्या मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना फोन करून घरी जेवायला बोलवले. डॉ. सुनील नकार देत म्हणाले की, हे त्यांच कर्तव्य होतं. परंतु त्या मुलाच्या आईने खूप आदर आणि सन्मानाने बोलवले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या म्हणाल्या, की जर तुम्ही नसतात तर माझा मुलगा आज नसता. तेव्हा त्यांना जाणवले की आपल्या देशात असे कित्येक लोक असतील ज्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. खासकरुन गरीब आणि गरजू जे रुग्णालयाचा खर्चही करु शकत नाहीत. 

या घटनेचा डॉ. सुनीलवर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यांनी त्यांच्याकडुन जेवढे होईल, तेवढे करायचे ठरवले. ते नोकरी सोडू शकत नव्हते, कारण त्यांना घरही सांभाळायचे होते आणि गरीबांना मदत करायला त्यांना निधीची गरज होती. त्यामुळे त्यांनी सुट्टीच्या दिवशी गरिबांना आणि गरजू लोकांना मदत करण्याचे ठरवले. जेव्हा त्यांना सुट्टी मिळायची, ते बेंगलुरू जवळच्या ग्रामीण भागात जावून मेडीकल कॅम्पस करत.    

मोबाईल डॉक्टर क्लिनिक

सुरवातीच्या दोन-तीन महिन्यात त्यांच्या काही मिञांनी त्यांना साथ दिली. नंतर सगळे त्यांच्या कामात व्यस्त झाले. त्यांना नंतर समजले की अशी कामं एकटल्याच पुढे करावी लागतील, त्यामुळेच त्यांनी त्यांच्या गाडीला मोबाईल क्लिनिक बनवले. त्यात गरजेच्या सगळ्या वस्तू म्हणजेच वैद्यकीय उपकरणे, फर्स्ट एड किट आणि औषधे आणि मगं सुट्टीच्या दिवशी वेग-वेगळ्या जागी वैद्यकीय सेवा द्यायला ते जायचे.    

२००७ मध्ये त्यांनी 'मातृ श्री फाउंडेशन'ची सुरवात केली. या फाउंडेशनचा हेतू देशाच्या प्रत्येक टोकाला आरोग्य सुविधा पोहचवायची होती. त्यांनी शाळा, कॉलेज, दुर्गम गावांशी संपर्क केला आणि त्या जागेवर मेडिकल कॅम्प करायला सुरू केले.  

२०१४ मध्ये त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि स्वत:ला पूर्णपणे समाजसेवेत समर्पित केले. त्यांनी बेंगलुरूच्या सर्जापूरमध्ये 'आयुष्यमान भव क्लिनिक' च्या नावावर एक छोटेसे आरोग्य केंद्र सुरू केले.   

इथे ते सायंकाळी ६ ते राञी १० पर्यंत लोकांचा उपचार करायचे. या क्लिनिकमध्ये येणारे लोक जास्तच जास्त गरीब असतात. डॉ. सुनील यांची इच्छा आहे की, कमीत कमी पैशात त्यांना चांगली सुविधा द्यावी. त्यांची फी ३० रुपये आहे आणि औषधांसोबत १००-१५० रुपये होते.  

ज्या लोकांना पैसे देणेचं शक्य नाही, त्यांची फ्रीमध्ये ट्रीटमेंट ते करतात. मागील काही वर्षात अजून काही समाजसेवक त्यांच्या सोबत आले. आतापर्यंत त्यांनी बेंगलुरूच्या जवळ-पासच्या शाळेत, झोपडपट्टी, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमामध्ये जवळ-जवळ ७२० कॅम्प लावले आहेत.

सोबत त्यांनी, ६ सरकारी आणि २ वृद्धाश्रमांना दत्तक घेतले. तिथे नियमितपणे आरोग्य सुविधा सुरू केली जाते. त्यांच्या सोबत १५० मेडिकल स्वत: जोडले गेले आहेत आणि जवळपास १२०० नॉन- मेडिकल स्वत: काम करत आहेत. या कॅम्पसव्दारे त्यांनी आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांना मदत केली आहे. 

डॉ.सुनील म्हणाले की, भारतात प्रत्येक दिवशी ४०० पेक्षा जास्ती अपघात होतात, परंतू मेडिकल केयर न मिळाल्यामुळे, त्यातले खूपकमी लोक वाचतात. जर दुर्घटनेच्या 'गोल्डन तासात' म्हणजेच ३०-४० मिनिटात प्राथमिक उपचार मिळाले, तर त्यातले खूप लोकांची वाचण्याची शक्यता वाढून जाते. सगळेच डॉक्टर आणि नर्स नसतात, पण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती असली पाहिजे. म्हणून ते शाळा- कॉलेजमध्ये या बद्दल मुलांना माहिती देतात.

आरोग्याचा अधिकार यात्रा

चांगल्या आरोग्य सेवा प्रत्येक देशात मुलभूत मानवधिकार आहेत, परंतु भारतात असे नाही. मुलभूत अधिकार शिक्षा, समानता, माहितीचा अधिकार यांच्या सोबत आपले संविधान आरोग्याचे अधिकार नाही दिले जात आणि डॉ. सुनील संघर्ष करत आहेत की, आपल्या देशात सर्वांना आरोग्य सुविधांचा अधिकार मिळायला पाहिजे.  

डॉ. सुनील म्हणतात की, आजपण भारतात जास्तच जास्त लोकांना आरोग्य सुविधा नाही मिळत. जिथे फिलीपिंस सारख्या देशात आपल्या नागरिकांना आरोग्याचा अधिकार देतात आणि अमेरिका त्यांच्या जीडीपीचा जवळ-जवळ १८% आरोग्य सुविधांवर खर्च करते आणि भारत अशा देशांमध्ये येतो जो आरोग्याच्या क्षेञात जीडीपीचा ३% पेक्षा कमी भाग खर्च करतोय.

सरकारकडून ज्या आरोग्यविषयक योजना आज चालवल्या जातात, त्याबद्दल तर शहरातल्या लोकांना माहिती देखील नाही. हिंदुस्तान टाइम्सच्या २०१६ च्या रिपोर्टनुसार १ हजार ५०० हून जास्त रूग्णांसाठी केवळ १ डॉक्टर उपलब्ध आहे.

या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवत डॉ. सुनील पूर्ण देशात आरोग्याला घेऊन एक चर्चा करू इच्छितात. त्यामुळे ते त्याच्या मोबाइल डॉ. क्लिनिकने पूर्ण देशात राईट टू हेल्थ याञा करत आहेत. डॉ़. सुनील बेंगलुरू ते कन्याकुमारीनंतर कन्याकुमारी ते काश्मिर जाणार आहेत. 

३०० दिवस चालणाऱ्या या याञेत ते ३०० ठिकाणी जाणार आहेत. यात स्थानिक सरकारी शाळा, एनजीओ, वृद्धाश्रम, कॉलेज, युनिवर्सिटीमध्ये जावून मेडिकल कॅम्पस करणार आहे. त्यांनी आधार कार्ड सारख हेल्थ कार्ड देखील बनवा याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

डॉ. सुनील म्हणतात की, या हेल्थकार्ड वर व्यक्तिच नाव, वय, ब्लडग्रुप आणि कोणत्या औषधापासून एलर्जी आहे, किंवा नाही याची माहिती दिली असेल. म्हणजेच जर कधी कोणी दुर्घटनाग्रस्त असेल आणि त्यांना ओळखणारी व्यक्ती तिथे नसेल, तरी पण त्याचा उपचार सुरू होऊ शकतो. ते आता ज्यांना पण भेटणार आहेत, त्यांना हे कार्ड देणार आहेत. त्यांचा प्रयत्न असा आहे की, या सगळ्या गोष्टी आरोग्य पॉलिसी मध्य़े जोडले जातील.  

आपल्या संविधानात देशातल्या नागरिकांना जीवन, शिक्षण, समानतेचा, माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. हे मूळ अधिकार आणि हक्क देण्य़ात आले आहेत. पण आरोग्याचे अधिकार दिलेले नाहीत. गरीब आणि गरजू लोकांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्यासोबत, देशाच्या आरोग्याच्या अधिकारांवर सार्वजनिक मोहीम सुरू करण्याचा माझा हेतू आहे."- डॉ. सुनील कुमार हेब्बी 

या याञेनंतर डॉ. सुनील त्यांचा रिपोर्ट दिल्लीच्या आरोग्य मंञालयात सादर करणार आहेत. म्हणजेच प्रशासनाला या मुद्द्यावर काम करायला सहायता मिळेल.

डॉ. सुनीलच्या या अभियानामुळे देशभरातले डॉक्टर त्यांना जुळत आहे. कारण हेल्थकेअर काही बिझनेस नाही सेवा आहे. 

डॉ. सुनील कुमार हेब्बी यांच्यासोबत त्यांच्या ' राईट टू हेल्थ याञेत' सहभागी होण्यासाठी 9741958428 वर व्हाट्सअप मेसेज करा.