Dusshera Stocks | दसऱ्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडा हे क्वॉलिटी स्टॉक; हाय रिटर्नची क्षमता

तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा उत्तम शेअर असायला हवे. 

Updated: Oct 15, 2021, 09:28 AM IST
Dusshera Stocks | दसऱ्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडा हे क्वॉलिटी स्टॉक; हाय रिटर्नची क्षमता title=

नवी दिल्ली : भारतीय शेअऱ बाजार सणासुदीच्या मुडमध्ये आहे. सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही ऐतिहासिक रेकॉर्डवर पोहचले आहेत. गुरूवारी सेंसेक्सने 61 हजारी टप्पा पार केला. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा उत्तम शेअर असायला हवे. जे येत्या काळात शानदार रिटर्न देऊ शकतील. मोतिलाल ओसवाल फायनान्शिएल सर्विसेस लिमिटेडचे रिटेल रिसर्च प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी गुंतवणूकदारांना काही दमदार स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 

SBI 
CMP 489 रुपये
Target 600 रुपये
मागील एका वर्षात या शेअरने 153 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर येत आहे. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेला गती देखील मिळाली आहे. त्यामुळे एसबीआयसारख्या मजबूत शेअरमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे.

Infosys
CMP 1714 रुपये
Target 1890 रुपये
या शेअरपासून मागील एका वर्षापासून 54.66 टक्के रिटर्न मिळाला आहे. कंपनीची क्लाउड आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची क्षमता पाहता या शेअरमध्ये आणखी तेजी शक्य आहे.

Birla Corp 
CMP 1426 रुपये
Target 1740 रुपये
मागील वर्षभरात या शेअरने 122.68 टक्के रिटर्न दिला आहे. सरकारचे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटवर विशेष लक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Lemon Tree 
CMP 54.95 रुपये
Target 64 रुपये
मागील वर्षभरात या शेअरने 101 टक्के रिटर्न दिला आहे. कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेत होणाऱ्या सुधारणेमुळे या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होऊ शकते.