Earthquake In Delhi: दिल्ली भूकंपाने हादरली, 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धक्के

Earthquake :  राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ हादरे जाणवले. (Earthquake In Delhi-NCR)  अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

Updated: Jan 24, 2023, 03:57 PM IST
Earthquake In Delhi: दिल्ली भूकंपाने हादरली, 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धक्के  title=
Earthquake News

Earthquake News :  देशाची राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ हादरे जाणवले. (Earthquake In Delhi-NCR) दरम्यान, शेजारी देश नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Earthquake in Delhi : Magnitude 5.8 quake hits Nepal, strong tremors felt in Delhi )

Delhi Earthqauke: राजधानी दिल्लीत आज दुपारी 2.28 वाजता भूकंपाचे धक्के बसले आहेत. 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की घरातील पंखे, फर्निचर इत्यादीही थरथरु लागले. 

आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अनेक रहिवाशांनी आपल्या घराच्या भिंती हादरताना पाहिल्या. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 10 सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के बसले आणि रहिवाशी घराबाहेर धावत रस्त्यावर आलेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये, दिल्ली, एनसीआर आणि इतर काही उत्तरेकडील राज्यांमध्ये उत्तराखंडमधील जोशीमठपासून 212 किमी आग्नेयेस नेपाळला 5.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, त्या सतत फिरत राहतात. जिथे या प्लेट्स जास्त आदळतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार आदळल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात. जर जास्त दाब असेल तर प्लेट्स तुटू लागतात आणि खाली असलेली ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधू लागते. या गडबडीमुळे भूकंप होतो.