भाजपच्या 'पप्पू'ला निवडणूक आयोगाचा आक्षेप

गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपाची एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकलीये.

Updated: Nov 15, 2017, 11:35 PM IST
भाजपच्या 'पप्पू'ला निवडणूक आयोगाचा आक्षेप  title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपाची एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. या जाहिरातीमधल्या पप्पू या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय आणि हा शब्द वगळण्याचे आदेश दिलेत.

निवडणूक आचारसंहितेनुसार कोणत्याही प्रचारपटाची संहिता आयोगाकडून मंजूर करून घ्यावी लागते. त्यासाठी जाहिरातीची ही संहिता आयोगाकडे पाठवण्यात आली असता पप्पू शब्दावर आक्षेप घेण्यात आला. आता या शब्दाऐवजी पर्यायी शब्द वापरून संहिता पुन्हा सादर करावी लागणार आहे.