Election results 2019 : 'ना लव्हली, ना आतिशी बॅटिंग, तर...'; गंभीरचा सिक्सर

लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आहे.

Updated: May 23, 2019, 07:02 PM IST
Election results 2019 : 'ना लव्हली, ना आतिशी बॅटिंग, तर...'; गंभीरचा सिक्सर title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आहे. दिल्लीमध्येतर भाजपने सगळ्या ७ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक रिंगणात होता. या निवडणुकीत विजय झाल्यानंतर गौतम गंभीर याने ट्विटरवरून त्याच्याविरोधातल्या उमेदवारांना लक्ष्य केलं.

ना 'लव्हली', ना 'आतिशी' बॅटिंग... भाजपच्या 'गंभीर' विचारधारेला पाठिंबा. राष्ट्रीय भाजप आणि दिल्ली भाजपचे आभार. नागरिकांनी या निवडीचा आम्ही अनादर करणार नाही, असं ट्विट गौतम गंभीरने केलं.

गौतम गंभीरच्या विरोधात पूर्व दिल्लीमधून काँग्रेसचे अरविंदरसिंग लव्हली आणि आपच्या आतिशी निवडणूक लढवत होत्या. गौतम गंभीरने काँग्रेसच्या अरविंदरसिंग लव्हली यांचा जवळपास ३,९०,००० मतांनी पराभव केला.

यासोबतच गौतम गंभीर याने अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. अरविंद या निवडणुकीतून केजरीवाल यांचा जमीर आणि इमान गेला आहे. ८ महिन्यामध्ये आप दिल्लीतली सत्ता गमवेल. जेवढं चिखल आपने दिल्लीमध्ये पसरवलं आहे. तेवढच कमळ दिल्लीत फुलेल, असं गंभीर म्हणाला.