कलह मिटवण्यासाठी तिला तांत्रिकाकडे नेलं, 79 दिवस डांबून त्याने असं काही केलं की...

घरगुती वाद शांत करण्याच्या नावाखाली सासरच्या मंडळींनी घरातील सुनेला एका तांत्रिकाकडे नेले.

Updated: May 9, 2022, 03:35 PM IST
कलह मिटवण्यासाठी तिला तांत्रिकाकडे नेलं, 79 दिवस डांबून त्याने असं काही केलं की...  title=

भुवनेश्वर : घरगुती वाद शांत करण्याच्या नावाखाली सासरच्या मंडळींनी घरातील सुनेला एका तांत्रिकाकडे नेले. हा वैवाहिक वाद सोडवण्याच्या नावाखाली तांत्रिकाने त्या सुनेला आपल्याकडे ठेवण्याची अट घातली. मात्र, सुनेने ती अट नाकारली.

बालासोर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या संदर्भात माहिती देताना जलेश्वर पोलिसांनी सांगितले की, वैवाहिक वाद सोडविण्यासाठी आपल्या सुनेला एका मुस्लिम तांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाने तिला काही दिवस आपल्याकडे ठेवावे लागेल असे तिच्या घरच्यांना सांगितले.

तिने त्या तांत्रिकासोबत राहण्यास नकार दिला. सासूने घरी आल्यावर तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ती महिला शुद्धीवर आली तेव्हा ती आपल्या मुलासह त्या तांत्रिकाच्या खोलीत दिसली. त्यानंतर त्या तांत्रिकाने तिला जबरदस्तीने तिला खोलीत डांबून ठेवले होते.

गेल्या महिन्यात 28 एप्रिल रोजी तो तांत्रिक आपला मोबाईल खोलीत विसरला. त्याच्या मोबाईलवरून तिने आपल्या आई वडिलांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्या महिलेच्या पालकांनी पोलिसांना माहिती असता त्यांनी शोध घेऊन महिला आणि तिच्या मुलाची सुखरूप सुटका केली.

त्या महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, आपला पती आणि सासरच्या मंडळींनी एका तांत्रिकासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात पीडित महिलेने एफआयआरमध्ये तिचा पती, मेव्हणा आणि इतर सासरची नावे नोंदवली आहेत. तसेच, घरगुती कलह मिटविण्याचा नावाखाली तांत्रिकाने तिच्यावर 79 दिवस बलात्कार केला, असा आरोपही तिने केला आहे. कलह मिटविण्याच्या नावाखाली बलात्कार करणाऱ्या त्या तांत्रिकाचा शोध आता पोलीस घेत आहेत.

दरम्यान, त्या तांत्रिकावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 376 (बलात्कार) यासह इतर अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने एफआयआरमध्ये पती, मेव्हणा आणि इतर सासरची नावे दिली आहेत, तरीही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.