'या' प्रसिद्ध IT कंपनीत मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना रोजगार, जाणून घ्या अधिक...

प्रसिद्ध आयटी कंपनी (IT company) अनेकांना रोजगार देणार आहे.

Updated: Jul 29, 2021, 09:29 PM IST
'या' प्रसिद्ध IT कंपनीत मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना रोजगार, जाणून घ्या अधिक... title=

मुंबई : कोरोनामुळे (Corona) अनेकांना आपला रोजगारावर (Employment) पाणी सोडावं लागलं. अनेक जण बेरोजगार झाले. याचा थेट फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. दरम्यान सध्या कोरोनाची दुसरी लोट ओसरतेय. यासह आता अनेक कंपन्यांमध्ये विविध पदासांठी मेगाभरती सुरु करण्यात आलीये. आयटी कंपनीत काम करावं, असं अनेकाचं स्वप्न असतं. अनेक तरुणाचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. प्रसिद्ध अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट अनेकांना रोजगार देणार आहे. (Famous IT company Cognizant will provide jobs to 1 lakh people)

कंपनीच्या उत्तपन्नात वाढ

कॉग्निझंट कंपनीच्या उतपन्नात जूनच्या तिमाहीत विक्रमी वाढ झाली. जून महिन्याच्या तिमाहीमध्ये कंपनीचे उतपन्न हे 41.8 टक्क्यांनी वाढून 51.02  कोटी अमेरिकन डॉलरच्या आसपास म्हणजे  3 हजार 801 कोटीपर्यंत पोहचलं. वाढलेल्या उतपन्नामुळे आता कंपनीला अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आमचा 1 लाख जणांना रोजगार देण्याचा मानस असल्याचं कंपनीने सांगितलंय. 

मेगाभरती बाबत कंपनीची प्रतिक्रिया

"आमची कंपनी 1 लाख लोकांना कंपनीत रुजू करुन घेण्यासह तितक्याच कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याच्या तयारीत आहोत. तसेच या सुरु असलेल्या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये 30 हजार पदवीधरांना रोजगार देणार आहोत. तसेच येत्या 2022 मध्येही 45 हजार ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना कंपनीत जॉईन करुन घेण्याचा मानस आहे", असं  कॉग्निझंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले ब्रायन हम्फ्रीज यांनी स्प्षट केलं. 

2 लाख जणांना रोजगार..

कॉग्निझंट कंपनीने 2 लाख जणांना सध्या नोकरी दिली आहे. कंपनीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झालीय. त्यामुळे भविष्याची पावलं ओळखून आणि अपेक्षित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आम्ही ग्राहकांना पूर्णपणे मदतीसाठी बांधील आहोत, असंही हम्फ्रीज यांनी नमूद केलं.