फारूक अब्दुल्ला PSA कायद्याअंतर्गत ताब्यात, पाहा काय आहे हा कायदा

PSA कायद्याअंतर्गत 2 वर्ष ताब्यात ठेवण्याचा अधिकार

Updated: Sep 16, 2019, 02:23 PM IST
फारूक अब्दुल्ला PSA कायद्याअंतर्गत ताब्यात, पाहा काय आहे हा कायदा title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना सोमवारी सार्वजनिक सुरक्षा कायदा
(PSA) अंतर्गत ताब्यात घेतलं आहे. ज्या ठिकाणी अब्दुल्ला यांना ठेवण्यात आलं आहे. त्या ठिकाणाला तुरुंग घोषित करण्यात आलं आहे.  पीएसएच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्या शिवाय 2 वर्ष ताब्यात ठेवलं जावू शकतं.

श्रीनगरमधून लोकसभा खासदार असलेले फारूक अब्दुल्ला हे 5 ऑगस्टपासून घरात नजरकैदेत आहेत. जम्मू-काशमीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने राज्यात जमावबंदी लागू केली होती. शिवाय अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

नॅशनल कॉन्फ्रेंसचे खासदार फारूक अब्दुला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी नेत्यांना परवानगी दिली होती. पण त्यानंतर मीडियासोबत न बोलण्याची अट त्यांना घालण्यात आली होती.

न्यायाधीश संजीव कुमार यांनी हसनैन मसूदी आणि अकबर लोन यांच्या याचिकेनंतर ही भेटण्याची संधी दिली होती. पण पुन्हा एकदा अब्दुला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.