30 फूट खाली पडून झाडावर लटकली कार; रोहित शेट्टीच्या फिल्मचा अ‍ॅक्शन सीन नाही तर...

अपघात ग्रस्त कारमधील लोक हे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. परत येताना त्यांच्या कार भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार झाडावर लटकली होती. 

वनिता कांबळे | Updated: May 13, 2023, 04:30 PM IST
30 फूट खाली पडून झाडावर लटकली कार; रोहित शेट्टीच्या फिल्मचा अ‍ॅक्शन सीन नाही तर... title=

Bihar Accident : एका महिलेला फरफटत नेत कार थेट 30 फूट खाली कोसळले. यानंतर ही कार झाडावर लटकते.  रोहित शेट्टीच्या फिल्मचा अ‍ॅक्शन सीन वाटतोय ना. पण, अशाचा प्रकारचा भीषण अपघात प्रत्यक्षात घडला आहे. बिहार मध्ये घडलेल्या या भयानक अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर झाडाला लटकेलेली कार पाहण्यासाठी स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती. 

बिहार मधील सुपौल जिल्ह्यातील भारत-नेपाल  बोर्डरवर हा अपघात झाला. मृत महिला रतनपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत  येणाऱ्या  पिपराही गांवची रहिवासी आहे. रानी देवी (वय 45 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघात ग्रस्त कारमधून प्रवास करत असलेले लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.  रतनपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत  येणाऱ्या  परमानंदपुर पंचायतचे ते सदस्य आहेत. 

लग्न सोहळ्यावरुन परत येताना अपघात

अपघातग्रस्त कार मधील लोक हे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्नसोहळ्यावरुन परत येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार महामार्गावरील कठडा तोडून थेट 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. 

कसा झाला अपघात?

कार भरधाव वेगात येत असताना ड्रायव्हरला एक महिला रस्ता ओलंडताना दिसली. या महिलेला वाचवण्यात हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणारी महिला कार खाली चिरडली गेली. मात्र, कार अती वेगात असल्याने ड्रायवरला नियंत्रण करता आले नाही. यामुळे कारसहित ही महिला फरफटत गेली. कार अनियंत्रीत झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेला डिव्हायजर तोडून ही कार 30 फूट खाली कोसळून एका झाडावर लटकली. अपघातग्रस्त लोकांचा आरडा ओरडा पाहून स्थानिक लोक यांच्या मदतीला धावून आले. स्थानिकांनी  अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढत पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थी दाखल झाले. यांनतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार झाडावरुन खाली उतरवली.  

रायगडमध्ये पर्यटकांच्या दोन कारची समोरासमोर धडक

रायगड जिल्ह्यातील माणगाव म्हसळा मार्गावर मोर्बा घाटात आज सकाळी पर्यटकांच्या दोन कारची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन सात जण जखमी झाले. डोंगरोली गावाजवळ हा अपघात झाला असुन मुंबईहुन परत येणाऱ्या रुग्णवाहीकेने मदतकार्य करत सर्व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.