क्षुल्लक कारणावरुन केली मुलीची हत्या, अन् बेडरुममध्येच मृतदेह...; नराधम बापाचा खरा चेहरा असा आला समोर

Crime News In Marathi: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनीच एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह बेडरुममध्येच पुरण्यात आला. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 21, 2024, 01:41 PM IST
क्षुल्लक कारणावरुन केली मुलीची हत्या, अन् बेडरुममध्येच मृतदेह...; नराधम बापाचा खरा चेहरा असा आला समोर  title=
Father murdered his daughter and buried her body in bedroom

Crime News In Marathi: बिहारच्या मोतिहारीमध्ये एक अंगावर शहरे आणणारी घटना घडली आहे. एका नराधम पित्याने मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह बेडरुमध्येच पुरला त्यानंतर वडील आरामात झोपले होते. इतकंच नव्हे तर, मुलीच्या मृतदेहाची लवकर विल्हेवाट लावावी यासाठी आरोपी वडिलांनी तिच्या मृतदेहावर चार किलो मीठदेखील टाकले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

भगवान दास असं आरोपी वडिलांचे नाव आहे. त्यांना दारूचे व्यसन आहे. त्यावरुन घरात सतत वाद होत होते. घटना घडली त्यादिवशीही असाच वाद झाला होता. त्यानंतर रोजच्या भांडणांना वैतागून त्यांची पत्नी चिडून शेजाऱ्यांकडे निघून गेली. त्यानंतर दास याने त्याच्या मुलीसोबत भांडण केले. भांडण इतकं विकोपाला गेले की त्याने रागाच्या भरात मुलीचा गळा दाबून हत्या केली. इतकंच नव्हे तर नराधम बापाने मुलीचा मृतदेह त्याच्याच बेडरुममध्ये पुरला. वरुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जिथे मृतदेह पुरला तिथे चार किलो मीठदेखील टाकले. त्यानंतर रात्रभर त्याच बेडरुममध्ये झोपला होता. 

रात्रभर मृतदेहासोबत राहिल्यानंतर तो सकाळी फरार झाला. मयत मुलीचे नाव राणी असं होते. मुलीची चूक इतकीच होती की तिने वडिलांना दारू पिण्यापासून रोखले तसंच, वडिल दारू पिऊन आईला मारहाण करत असताना त्यांचा विरोध केला. इतक्याशा कारणावरुन वडिलांनी मुलीची हत्या केली. हत्येची घटना शनिवारी घडली आहे. जेव्हा राणीची आई सकाळी घरी आली तेव्हा तिने राणी घरी नव्हती. तिने संपूर्ण घर शोधलं मात्र राणी कुठेच आढळली नाही. अखेर तीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर राणीच्या भावाने या हत्याकांडाचा खुलासा केला. 

राणीच्या भावाने या पूर्ण घटनेची माहिती दिली. त्याने म्हटलं की, माझ्या वडिलांनीच बहिणीचा खून केला. मुलाच्या जबाबानुसार सच्चिदानंद पांड्ये यांनी बेडरुमचे खोदकाम करण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलीचा मृतदेह सापडला आणि ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून आरोपी वडिलांचा कसून शोध सुरू आहे.

मोतिहार एसपी यांनी रामगढ पोलिस स्टेशनच्या परिसरात अशी घटना घडल्याची पुष्टी केली आहे. एका मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी लगेचच कारवाई करत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणात मुलीच्या काकाला अटक करण्यात आली आहे.