तेलात डोळे टाकून आलात, तरीही या कारपेटमध्ये असलेला स्मार्टफोन तुम्ही शोधू शकणार नाही

 तुम्ही हा फोटो नीट पाहा आणि फोन शोधा

Updated: Mar 4, 2022, 06:16 PM IST
  तेलात डोळे टाकून आलात, तरीही या कारपेटमध्ये असलेला स्मार्टफोन तुम्ही शोधू शकणार नाही title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो व्हायरल होतात. अनेकदा जुने फोटो देखील पुन्हा व्हायरल होतात. आता एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये एक फोन लपलेला आहे, फार कमी लोकांना या फोटोतील फोन शोधण्यात यश आले आहे. व्हायरल होत असलेला हा फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा फोटो नीट पाहा आणि फोन शोधा

कार्पेटवर एक टेबल असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कार्पेट खूप सुंदर दिसत आहे, पण तुम्हाला या कार्पेटवर फोन शोधायचं चॅलेंज आहे. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर तुम्हाला या कार्पेटमध्ये लपलेला फोन नक्कीच सापडेल. हा फोटो अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो फेसबुकवर एका युजर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या फोटोला सुमारे 1 लाख 52 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर हा फोटो 22 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे.

या गालिच्यामध्ये मोबाईल फोन कुठे लपवला आहे. मोबाईलचे मागील कव्हर कार्पेटच्या डिझाईन प्रमाणेच असल्याने मोबाईल सहज दिसणार नाही. उजव्या बाजूला टेबलच्या अगदी बाजूला हा फोन दिसेल, कारण तो फोन सरळ न ठेवता उलटा ठेवला आहे. मोबाईलचा कॅमेराही दिसतो आहे.