पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ८ नागरिक जखमी

संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली नापाक वृत्ती दाखवली आहे. जम्मू काश्मिरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिकच्या गावांवर, पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात ८ नागरिक जखमी झाले. यात एका 2 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

Updated: Oct 18, 2017, 11:16 PM IST
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ८ नागरिक जखमी title=

श्रीनगर : संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली नापाक वृत्ती दाखवली आहे. जम्मू काश्मिरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिकच्या गावांवर, पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात ८ नागरिक जखमी झाले. यात एका 2 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

 पाकिस्तानने केलेल्या हल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी पाऊणे आठच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्यांमध्ये तीन मजूर आणि एका महिलेचाही समावेश आहे. ही महिला मनकोटे परिसरात राहणारी आहे.

 मोटर्स, स्वयंचलीत आणि छोट्या हत्यारांनी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने पूंछ येथील मनकोटे आणि बालकोटे परिसरातील १८ गावांना लक्ष बनवले. पाकच्या या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले. पण, काही पाळीव प्राणीही मारले गेले. या गोळीबारात एक खासगी वाहान आणि एक विद्यूत ट्रान्सफॉर्मरची मोठी हानी झाली. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय जवानांनी तोडीस तोड उत्तर दिले.