काश्मीरपासून राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त दाट धुकं

गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. मात्र बुधवारी मात्र सगळ्यात जास्त दाट धुकं पाहायला मिळालं.

Updated: Jan 4, 2018, 11:28 AM IST
काश्मीरपासून राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त दाट धुकं title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. मात्र बुधवारी मात्र सगळ्यात जास्त दाट धुकं पाहायला मिळालं.

धुक्याची दाट चादर

बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाकिस्तानपासून ईशान्य भारतापर्यंत धुक्याची दाट चादर पसरली होती. भारतीय उपखंडातील जवळपास दोन हजार किलोमीटरपर्यंतच्या मैदानी प्रदेशावर हे दाट धुकं पसरलं होतं. भारतीय राष्ट्रीय उपग्रहाद्वारे प्रसारित थ्रीडी फोटोमध्ये पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत ही धुक्याची दाट चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. 

धुकं पश्चिमेच्या दिशेने

दाट धुक्याची सुरुवात २५ डिसेंबरपासून उत्तर प्रदेश आणि बिहारपासून झाली. त्यानंतर दिवसागणिक हे धुकं पश्चिमेच्या दिशेने सरकत दोन जानेवारीला पंजाब आणि मग पुढे पाकिस्तानपर्यंत पोहचलं. या धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक ठप्प झाली होती.