मोठी बातमी । परदेशातून आलेले आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

Omicron India : जगभरात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus new variant) ओमायक्रोनची (Omicron) भीती अधिक गडद होत चालली आहे.  

Updated: Dec 2, 2021, 02:17 PM IST
मोठी बातमी । परदेशातून आलेले आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह title=
संग्रहित छाया

मुंबई : Omicron India : जगभरात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus new variant) ओमायक्रोनची (Omicron) भीती अधिक गडद होत चालली आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर अमेरिका, सौदी अरेबिया या देशात ओमायक्रोनचा धोका वाढला आहे. आता भारतात परदेशातून आलेले चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

'ओमायक्रोन' पार्श्वभूमीवर भारताने ( india) आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कडक उपाययोजना केल्या आहेत. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेले चार प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह (omicron) आढळून आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. भारताने ओमायक्रोन चा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांची यादी जारी केली. यात दक्षिण आफ्रिकेसह यूरोपातील देशांचा समावेश आहे. आता ओमायक्रोनचा संसर्ग असलेल्या धोकादायत देशांमधून आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे टेन्शनमध्ये आणखी भर पडली आहे.