LED TVच्या स्फोटामुळे एकाचा मृत्यू; 'या' चुका तुम्हीही करू नका

स्फोट इतका भयंकर होता की, खोलीच्या भिंतीचा काही भागही कोसळला

Updated: Oct 6, 2022, 04:16 PM IST
LED TVच्या स्फोटामुळे एकाचा मृत्यू; 'या' चुका तुम्हीही करू नका title=
(फोटो सौजन्य - PTI)

LED TV Blast : गाझियाबादमध्ये (ghaziabad) एलईडी टीव्हीचा (LED TV) स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात एका 16 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. स्फोट (Blast) इतका जोरदार होता की ज्या खोलीवर टीव्ही (TV) लावला होता त्या खोलीच्या भिंतीचा काही भागही कोसळला. रिक्षाचालक निरंजन यांची पत्नी ओमवती, मुलगा आणि त्याचा मित्र घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत एलईडी टीव्हीवर (LED TV) कार्यक्रम पाहत होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एलईडीमध्ये (LED TV) अचानक स्फोट झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि त्यांनी निरजनच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा खिडक्यांमधून धूर निघत होता.

यादरम्यान काही लोकांनी हिंमत दाखवत घरात प्रवेश केला. संपूर्ण खोली धुराने भरली होती आणि जळण्याचा वास येत होता. स्थानिक लोकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी 16 वर्षीय मुलाला मृत घोषित केले.

आतापर्यंत आपण इलेक्ट्रीक उपकरणांमध्ये मोबाईलमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण एलईडी टीव्हीचा (LED TV) स्फोटामुळे मृत्यू झाल्याची कदाचित पहिलीच वेळ असेल. त्यामुळे आता तुम्हालाही टिव्ही पाहताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. काही छोट्या गोष्टींद्वार तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला अशा घटनांपासून सुरक्षित ठेवू शकता.

घरातील जुनी वायरिंग

घरातील जुनी वायरिंग (Electrical wiring) हे विद्युत उपकरणांना आग (electronic gadgets) लागण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी तुमच्या घरातील जुन्या वायरिंगची (wiring) काळजी घेणे गरजेचे आहे. जुन्या वायरिंगमुळेही अनेकदा शॉर्टसर्किट (Short Circuit) होतात आणि त्यामुळे घरामध्ये आग लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. टीव्हीला जास्त वेळ स्टँडबाय मोडमध्ये (standby mode) ठेवू नका. टीव्ही पाहत नसताना, तो व्यवस्थित बंद करा जेणेकरून तो थंड होण्यास थोडा वेळ मिळेल.

इलेक्ट्रिकल सर्किट ओव्हरलोड

घरामध्ये जास्त एक्स्टेंशन बोर्ड (extension board) वापरणे धोकादायक ठरू शकते. टीव्ही, कॉम्प्युटर आणि इतर विद्युत उपकरणे (electronic gadgets) एक्सटेंशन बोर्डशी (extension board)  जोडल्याने विद्युत भार लक्षणीय वाढतो. बर्‍याच वेळा लोकांना एक्स्टेंशन बोर्डची क्षमता माहित नसते आणि नकळत ते काही धोकादायक घटनांला आमंत्रण देतात. ओव्हरलोडिंगमुळे एक्स्टेंशन बोर्डची अंतर्गत वायरिंग जास्त गरम होऊन आग लागू शकते.

जुना टीव्ही खराब झाल्यास, बरेचदा लोक काही पैसे वाचवण्यासाठी अधिकृत सेवा केंद्राऐवजी आजूबाजूच्या परिसरातील तंत्रज्ञांकडून त्याची दुरुस्ती करून घेतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेच बदला. टीव्ही दुरुस्त करण्यासाठी हे तंत्रज्ञ चुकीची वायरिंग आणि कॅपेसिटर वापरू शकतात. टीव्हीमध्ये चुकीचा कॅपेसिटर बसवल्याने टीव्ही जास्त गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते.