तरुणाच्या 4 गर्लफ्रेंड एकाचवेळी घरी पोहोचल्या, त्यानंतर जे काही झाले त्याची कल्पना करू शकत नाही !

Girlfriend Boyfriend News:  एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 

Updated: Nov 12, 2021, 07:52 AM IST
तरुणाच्या 4 गर्लफ्रेंड एकाचवेळी घरी पोहोचल्या, त्यानंतर जे काही झाले त्याची कल्पना करू शकत नाही ! title=

कूचबिहार : Girlfriend Boyfriend News:  एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहारमधून येथे एका तरुणाच्या घरी त्याच्या 4 मैत्रिणी एकत्र पोहोचल्या. त्यानंतर झालेला प्रकार त्याला सहन झाला नाही आणि त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर त्यांने विष प्राशन केले.

4 मैत्रिणींनी बॉयफ्रेंडला केले सरप्राईज

सुभामॉय कार असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या चार मैत्रिणी होत्या. त्या अचानक घरी आल्या आणि त्याला मोठा धक्का बसला. त्याला काय कराचे ते समजत नव्हते. या मैत्रिणी एकाच दिवशी योगायोगाने त्याच्या त्याच्या समोर आल्यात. त्या घरी पोहोचल्या खऱ्या, मात्र त्याला मिळाले हे सरप्राईज अखेरचे ठरले.

 4 मैत्रिणी पाहून तरुणाची ही अवस्था

आपल्या 4 मैत्रिणींना एकत्र पाहून सुभामॉय घाबरला होता. त्याच्या चारही मैत्रिणी समोरासमोर आल्यावर सुभामॉय आपली फसवणूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी सुभामॉय याला खूप वाईट बोलणे सुरु केले. यामुळे सुभमाय घाबरला.

तरुणाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले

आपल्या चार मैत्रिणींचे म्हणणे ऐकून सुभामॉय याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच सुभामॉय याच्या शेजाऱ्यांनी त्याला माथाभंगा येथील रुग्णालयात नेले. तेथून सुभामॉय याला कूचबिहार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही, हे विशेष. त्याचबरोबर सुभामॉय याच्या कुटुंबीयांनीही याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभामॉय याचा जीव आता धोक्याबाहेर आहे.