विद्यार्थिनींकडून अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरची धुलाई

प्रोफेसरची विद्यार्थिनींनी केली चांगलीच धुलाई

Updated: May 7, 2018, 01:31 PM IST
विद्यार्थिनींकडून अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरची धुलाई title=

नवी दिल्ली : पंजाबच्या पटियालामध्ये एका प्रोफेसरची विद्यार्थिनींनी चांगलीच धुलाई केली. हा प्रोफेसर विद्यार्थिंनींना अश्लील मॅसेज करायचा. त्यानंतर भररस्त्यात विद्यार्थिनींनी याची धुलाई केली. पटियाला वुमेन कॉलेजमध्ये आरोपी प्रोफेसर पंजाबी विषय शिकवायचा. मागील काही दिवसांपासून तो विद्यार्थिंनींना अश्लील मॅसेज पाठवत होता. काही विद्यार्थिंनींनी प्रोफेसरला असे मॅसेज न पाठवण्याचा इशारा देखील दिला पण तरी तो विद्यार्थिंनींना असे मॅसेज पाठवत होता. यानंतर तीन-चार विद्यार्थिंनींनी कॉलेज कँपसमध्ये आरोपी प्रोफेसर धरलं आणि त्याची चांगलीच धुलाई केली.

आरोपी प्रोफेसर विद्यार्थिंनींसमोर माफी मागत होता. विद्यार्थिंनींनी आरोपी प्रोफ्रेसरला खेचून नेलं. तो स्वतःचा बचाव करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थिंनींनी आरोपी प्रोफेसरला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी मध्यस्थी करत या प्रकरणात प्रोफेसरला ताकीद दिली आहे.