सोनं आणि चांदीच्या दरात घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर एक चांगली संधी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 16, 2017, 05:50 PM IST
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण title=
Representative Image

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर एक चांगली संधी आहे.

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाल्याने सोनं आता ३०,५२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे.

स्थानिक सराफांकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घट झाल्याचं बोललं जात आहे. सोन्याच्या दरातचं नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

चांदीच्या किंमतीत ७५ रुपयांनी घट झाल्याने ४०,६५० रुपये प्रति किलोग्राम स्तरावर पोहोचली आहे. शिक्का निर्मात्यांच्या मागणीत घट झाल्याने चांदीत घसरण झाल्याचं दिसत आहे.

अमेरिकेत इकॉनॉमिक डेटाच्या अपेक्षेपेक्षा चांगला आल्यानंतर पूढील महिन्यात व्याज दरात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. यासोबतच स्थानिक ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट हे सुद्धा यामागचं एक कारण आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे क्रमश: ३०,५२५ रुपये आणि ३०.३७५ रुपये प्रति १० ग्राम असा सोन्याचा दर झाला आहे. तीन सत्रांत सोन्याच्या किंमतीत १७५ रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.