सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत

Updated: Jul 21, 2022, 04:44 PM IST
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर title=

Gold-Silver Rate Today : गोल्ड प्राईझमध्ये आजही मोठी घट पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत सोन्याच्या किमतीवरचा प्रभाव आजही कायम आहे. गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत. त्यामुळे आता खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष खुशखबर आहे. 

सोन्याचे भाव हे कधी चढते असतात किंवा उतरते असतात. त्यामुळे निश्चित त्याचा खरेदीवर परिणाम होतो. एकीकडे आज चांदीच्या दरातही 400 रुपयांहून अधिक घसरण दिसून आली आणि त्यातच सोन्याचे भावही उतरले आहेत. तेव्हा तुम्हाला जर का सोने खरेदी करायचे आहे तर नक्की विचार का तुमच्या सोन्याच्या शॉपिंगची चांगलीच संधी आहे. 

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

मल्टीकमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज सकाळी 24 कॅरेट प्यूअर गोल्ड फ्युचर्स किंमत 250 रुपयांनी घसरून 49,958 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, तर MCX वर चांदीची फ्युचर्स किंमत 480 रुपयांनी घसरून 55,130 रुपये झाली. याआधी सोन्याचा व्यवहार 50 हजारांच्या पातळीवर सुरू झाला होता परंतु मागणीतील नरमाई आणि जागतिक बाजारातील घसरणीमुळे लवकरच फ्युचर्सचे भाव खाली गेले. दुसरीकडे 55,450 रुपयांवर व्यापार सुरू केल्यानंतर चांदीचा भावही घसरला.

सोन्याचे दर मागील बंद किमतीपेक्षा सुमारे 0.5 टक्‍क्‍यांनी घसरले आहे तर चांदी सध्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.88 टक्‍क्‍यांनी घसरत आहे. आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.