राजस्थानात सापडले 11.48 कोटी टन सोनं

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बांसवाडा, उदयपूर जिल्ह्यामध्ये 11.48 कोटी टन सोन्याचा भंडार हाती लागला आहे. 

Updated: Feb 9, 2018, 08:28 PM IST
राजस्थानात  सापडले 11.48 कोटी टन सोनं

जयपूर : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बांसवाडा, उदयपूर जिल्ह्यामध्ये 11.48 कोटी टन सोन्याचा भंडार हाती लागला आहे. 

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे अधिकारी एन कुटुंबा राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये अजून सोनं सापडण्याची शक्यता आहे. उद्यपूर, बांसवाडा या परिसरात मिळालेल्या सोन्याचा खजिना सापडला आहे. यामध्ये 35.65 कोटी टनाचे शिसं,जस्त यांनी बनलेले राजपुरा दरिबा खनिज पट्टीत मिळाले आहे. सोबतच भीलवाडा जिल्ह्यातील सलामपुरा परिसराजवळ  शिसं आणि जस्ताचा खजिना सापडला आहे. 

तांब्याचाही साठा 

राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 साली 8.11 कोटी टन तांब्याचा खजिना हाती लागला होता. राजस्थानामध्ये अनेक ठिकाणी अन्य खनिजांचा साठा सापडतोय का ? याबाबत शोध सुरू आहे. 

इतर ठिकाणीदेखील शोध सुरू  

सवाई माधवपूर आणि इतर भागातही ग्लुकोनाईट आणि इतर खनिजांचा शोध सुरू आहे.