केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी

जानेवारी 2021 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता...  

Updated: Jan 3, 2021, 08:28 AM IST
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी title=

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे... या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 पासून ही वाढ करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 28 टक्के होईल. केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना तसेच 60 लाख निवृत्ती धारकांना याचा लाभ होईल. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.

याआधी जुलै 2020 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला. त्यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता पुन्हा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.  

सरकारने कर्मंचाऱ्यांना महागाई भत्ता दिलेला नाही. त्यामुळे आता एकत्र 11 टक्के वाढीसह कर्मंचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता देण्यात येत होता. आता नव्या वाढीनंतर महागाई भत्ता 28 टक्के होणार आहे.