शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता गॅरंटीशिवाय 1.60 लाखांचे मिळू शकते कर्ज आणि बरेच फायदे, जाणून घ्या कसे ते?

शेतकऱ्यांसाठी ( farmers) एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.  

Updated: Nov 9, 2021, 07:12 AM IST
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता गॅरंटीशिवाय 1.60 लाखांचे मिळू शकते कर्ज आणि बरेच फायदे, जाणून घ्या कसे ते? title=
संग्रहित छाया

मुंबई : शेतकऱ्यांसाठी ( farmers) एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. आता हरियाणा सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (PM Kisan Benefits) करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. (Pashu kisan credit card scheme) याअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. (Good news for farmers! Now you will be able to take a loan of Rs 1.60 lakh without guarantee and many more benefits)

पशु किसान क्रेडिट कार्ड

पशु किसान क्रेडिट कार्ड हे मोदी सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेसारखेच आहे. यामध्ये गाय, म्हैस, मेंढ्या, शेळी आणि कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उपलब्ध होणार आहे. इतकेच नाही तर यामध्ये 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेण्यासाठी कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार जमिनीवर काम करत आहे. बँकर्स समितीने सरकारला आश्वासन दिले आहे की सर्व पात्र अर्जदारांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळेल. अशी अनेक लाख कुटुंबे आहेत. ज्यांच्याकडे दुभती जनावरे आहेत आणि त्यांना टॅग केले जात आहे. जाणून घेऊया सरकारच्या या खास योजनेबद्दल.

कोणत्या प्राण्यासाठी किती पैसे मिळतील?

गाय - 40,783 रुपये प्रति गाय उपलब्ध होईल.
म्हैस - 60,249 रुपये प्रति म्हैस मिळेल. 
मेंढ्या-मेंढ्यासाठी 4063 रुपये प्रति मेंढी उपलब्ध असेल.
कोंबडी (अंडी देणारी) 720 रुपये प्रति कोंबडी दिले जाईल.

ही कागदपत्रे आवश्यक आहेत
अर्जदार हरियाणा राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र.
मोबाईल नंबर.
पासपोर्ट आकाराचा फोटो.

व्याज किती असेल ते जाणून घ्या

पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना 4 टक्के व्याज द्यावे लागेल.
केंद्र सरकारकडून तीन टक्के सूट देण्याची तरतूद आहे.
कर्जाची रक्कम कमाल 3 लाख रुपयांपर्यंत असेल.