Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू

 Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.

Updated: Jan 28, 2023, 11:26 AM IST
Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू title=
Mutual Funds investor

Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी आता खूशखबर आहे. (Mutual Funds investor) गुंतवणूक काढताना दोन दिवसात खात्यात पैसे जमा होणार आहेत. (Mutual funds News) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे. (Mutual funds News in Marathi) आता म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तीन दिवसांच्या आत खातेदाराच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने जारी केलेत.

याआधी आपल्या फंडाचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी 10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता कमी करण्यात आलाय. तसेच कर्जावरील वाढत्या व्याजदरांनुळे देशातल्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमधून ठेवी काढून घेतल्यात आहेत. सप्टेंबर महिन्यात 65 कोटींच्या ठेवी म्युच्युअल फंडमधून काढून घेतल्याचे समोर आले आहे.

म्युच्युअल फंडातून पैस काढताना...

अनेक म्युच्युअल फंडातून (Mutual Fund) कोणत्याही वेळी आपण आपली गुंतवणूक अर्थात पैसे काढून घेऊ शकतो. म्युच्युअल फंडातून पैसे काढणे या प्रक्रियेला रिडेम्प्शन (Redemption) म्हणतात.  म्युच्युअल फंड योजनेतून पैसे काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मालकीच्या युनिट्सची विक्री करता. यावेळी त्या फंडाच्या एनएव्हीप्रमाणे (NAV) आपल्याला पैसे मिळतात. मात्र, असे काही फंड आहेत ज्यांचा लॉक-इन कालावधी असतो. या फंडांचा लाॅक - इन कालावधी संपल्यानंतरच आपल्याला पैसे काढता येतात.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELLS) फंडांचा मॅच्युरिटी लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा आहे. हा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढून शकतो. काही म्युच्युअल फंड योजना ठराविक कालावधीच्या आधीच पैसे काढल्यास एक्झिट लोड म्हणजे चार्ज आकारतात. तसेच डेट फंडातून 36 महिन्यांच्या आत पैसे काढल्यास अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जातो. मिळालेल्या परताव्यावर तुमच्या स्लॅब दरांनुसार कर आकारला जातो.