IMF नंतर, जागतिक बँकेने दिले अच्छे दिनाचे संकेत, 'कोविड संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे'

 भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक बँकेने हे संकेत दिले आहेत.  

Updated: Oct 14, 2021, 06:39 AM IST
IMF नंतर, जागतिक बँकेने दिले अच्छे दिनाचे संकेत, 'कोविड संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे'   title=
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक बँकेने हे संकेत दिले आहेत. जागतिक बँकेचे  (World Bank) अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) यांनी बुधवारी सांगितले की, कोविड -19 साथीच्या आजाराने ग्रासलेली भारतीय अर्थव्यवस्था आता संकटातून सावरण्याच्या स्थितीत आहे आणि जागतिक बँक त्याचे स्वागत करते. (Indian Economy is Recovering from Covid-19 Crisis: World Bank President)

'कोविड संकटातून भारत सावरत आहे'

मालपास असेही म्हणाले की, भारताला संघटित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) अधिक लोकांना सामावून घेण्याचे आणि लोकांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. भारताने या दिशेने थोडी प्रगती केली आहे, मात्र ती पुरेशी नाही. मालपास म्हणाले, 'कोविडच्या लाटेमुळे भारतीयांना खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि ते दुर्दैवी आहे. भारतीय कोरोना लसचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि लसीकरणाचे प्रयत्न वाढवून त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि विशेषत: असंघटित क्षेत्रावर (Unorganized Sector) काय परिणाम झाला आहे ते शोधावे लागेल. '

महागाईमुळे (Inflation) भारतावर परिणाम  

गेल्या आठवड्यात, जागतिक बँकेने  (World Bank) भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) यावर्षी 8.3 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक बँकेचे अध्यक्ष मालपास म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे, आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. भारताने कोविडच्या सध्याच्या लाटेवर मात केली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र, इतर देशांप्रमाणेच भारतालाही आता पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जगातील वाढत्या महागाईचा  (Inflation)  फटका बसत आहे.

IMFनेही दिले चांगले संकेत 

मंगळवारीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF)  भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी दिली. आयएमएफने यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यासह, IMF द्वारे असे म्हटले गेले की पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये, विकास दर 8.5 टक्के दराने वाढू शकतो. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत 2020-21 या आर्थिक वर्षात 7.3 टक्क्यांची घट झाली आहे.