होणाऱ्या सासूला नाचताना पाहून नवऱ्या मुलाने लग्नालाच दिला नकार; लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा

Groom Calls Off Marriage Due To Mother-In-Law: हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात घडला आहे. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आलेलं. मात्र या अरेंज मॅरेजमध्ये अगदी ऐनवेळी मिठाचा खडा पडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2023, 08:50 AM IST
होणाऱ्या सासूला नाचताना पाहून नवऱ्या मुलाने लग्नालाच दिला नकार; लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा title=
लग्नासाठी वर पक्ष लग्नमंडपामध्ये पोहोचला आणि समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्का बसला

Groom Calls Off Marriage Due To Mother-In-Law: भारतातील लग्न समारंभ म्हटलं की लग्नाआधीचे काही दिवस आणि लग्नानंतरच्या काही दिवसांमध्येही अनेक विधी आणि कार्यक्रम पार पडतात. यामधील काही कार्यक्रमांमध्ये वर आणि वधू पक्ष एकत्र असतात तर काही विधी वेगवेगळे केले जातात. मात्र अशाच एका कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या सासूचा यापूर्वी न पाहिलेला अवतार पाहून उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने लग्नालाच नकार दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रामध्ये सिगारेट फुंकत नाचणाऱ्या सासूला पाहून तरुणाने लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं घडलं काय

उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. 27 जून रोजी दोन्ही बाजूने ठरवल्याप्रमाणे लग्न पार पडणार होतं. हे अरेंज मॅरेज असल्याने दोघांच्या घरच्या नातेवाईकांचा फारसा परिचय पूर्वीपासून नव्हता. नवरा मुलगा वऱ्हाड घेऊन लग्नसमारंभाच्या ठिकाणी पोहोचला असता त्याला समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला. वर पक्षाचं स्वागत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या डान्सच्या कार्यक्रमात आपली होणारी सासू ही धुम्रपान करत नाचत असल्याचं नवऱ्या मुलाला दिसलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असं टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. समोरचा सारा प्रकार पाहून या नवऱ्या मुलाने डान्स थांबवला आणि आपला आक्षेप नोंदवला. त्यानंतर वर आणि वधू पक्षामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नवऱ्या मुलाने मला लग्न करायचं नाही असं सांगितल्यानंतर वाद आणखीनच चिघळला. 

पंचायत बोलावली अन्...

नवऱ्याने लग्नाला नकार दिल्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पंचाच्या मध्यस्थीनंतर दोन्ही कुटुंबांनी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांनी लग्न लावून देण्यास होकार दिला आणि पुढील कार्यक्रम शांतते पार पडला. मात्र सासूमुळे हे लग्न मोडण्याचा होणाऱ्या जावायाने घेतलेला निर्णय पंचक्रोषीत चर्चेचा विषय मात्र नक्की ठरला.

20 किमीपर्यंत केला नवऱ्याचा पाठलाग

उत्तर प्रदेशमध्ये लग्नांदरम्यान असे विचित्र प्रकार घडण्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच येथील एका लग्नामध्ये लग्नाच्या कपड्यांमध्येच नवरी मुलीने पळून गेलेल्या नवऱ्या मुलाचा तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. त्याला गाठलं आणि लग्न केलं. हे दोघेही अडीच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा लग्नपंडपामध्ये आलाच नाही. फोन केला असता आपण आईला आणायला जात असल्याचं सांगितलं. मात्र तिचा विश्वास बसला नाही आणि तिने त्याचा पाठलाग करत त्याला गाठलं. ही मुलगी या मुलाचा शोध घेत बरेलीच्या बसस्टॉपवर पोहोचली तेव्हा नवरा मुलगा पळून जाण्याच्या तयारीत होता. तिने त्याच्याशी चर्चा करुन लग्नासाठी होकार मिळवला आणि बसस्टॉप समोरच्या मंदिरातच दोघे विवाहबंधनात अडकले. या लग्नाची राज्यभर चर्चा होती.